Image Used for Representational Purpose only | (Photo Credits: File Photo)

IRCTC Change Rules for Online Ticket Booking: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्वाची बातमी आहे, कारण जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तिकिट बुकिंग करत असाल तर आयआरसीटीसीकडून त्या संदर्भातील नियमात बदल करण्यात आले आहेत. नव्या नियमांनुसार, प्रवाशांना ऑनलाईन तिकिट बुकिंग करताना आता मोबाईल क्रमांक किंवा ई-मेल आयडी चे वेरिफिकेशन करावे लागणार आहे. त्यानंतरच तुम्हाला तिकिट दिले जाणार आहे.

कोरोनाच्या परिस्थितीमुळे तिकिट बुकिंग न करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेकडून हा नवा नियम जाहीर केला आहे. अशातच लोकांना आयआरसीटीसीच्या माध्यमातून तिकिट खरेदी करण्यापूर्वी आपला मोबाईल क्रमांक आणि ईमेल वेरिफाय करावा लागणार आहे. पण जे प्रवासी नियमितपणे ऑनलाईन तिकिट बुकिंग करतात त्यांना मात्र या प्रक्रियेतून सूट देण्यात आली आहे.(Aadhaar Card: तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होतोय का? आता घरी बसल्या मिनिटांत तपासा, 'या' पद्धतीने करा चेक)

कोरोनाची परिस्थिती जसजशी सुधारण्यास सुरुवात झाली तेव्हापासून ट्रेन पुन्हा पूर्णक्षमेतेने धावण्यास परवानगी देण्यात आली. अशातच तिकिटांची विक्री सुद्धा वाढली गेली. आयआरसीटीसीच्या दिल्लीतील मुख्यालयाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, कोरोना संक्रमणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आणि त्यापूर्वी जे अकाउंट पोर्टलवर निष्क्रिय होते त्यांना सुनिश्चित करण्यासाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेलचे वेरिफिकेशन करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

>>कसे कराल वेरिफिकेशन?

-प्रथम IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या

-येथे तुमचा रजिस्टर मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी दाखल करा

-आता डाव्या बाजूला Editing आणि उजव्या बाजूला Verification असे ऑप्शन दिसेल

-वेरिफिकेशनचे ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP मिळेल

-आटोपी दाखल केल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक वेरिफाय होईल

-अशाच प्रकारे तुम्ही ईमेल आयडी सुद्धा फेरिफिकेशन करु शकता. पण यावेळी ओटीपी तुम्हाला ईमेल आयडीवर पाठवला जाईल

आयआरसीटीसीसाठी ऑनलाईन पद्धतीने तिकिट बुकिंग करताना प्रथम एक आयडी तयार करावा लागतो.  येथे प्रवाशाला आपला मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी द्यावा लागतो. त्यानंतर ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांकाचे वेरिफिकेशन झाल्यानंतरच तिकिट बुक करता येणार आहे.