सीबीआय संचालक पदी  ऋषी कुमार शुक्ला यांची वर्णी
IPS Rishi Kumar Shukla (Photo Credits: Twitter)

आलोक वर्मा यांच्यानंतर रिक्त असलेल्या सीबीआय संचालक(CBI Director)  पदाचा कार्यभार आयपीएस अधिकारी ऋषी कुमार शुक्ला (Rishi Kumar Shukla) यांच्याकडे देण्यात आला आहे. आयपीएस अधिकारी ऋषी कुमार शुक्ला हे मध्य प्रदेशचे माजी डीजीपी आहेत.पुढील दोन वर्षांसाठी सीबीआय संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना या दोन अधिकाऱ्यांच्या वादामुळे, अंतर्गत राजकारणामुळे मागील काही दिवसांपासून सीबीआय चर्चेमध्ये होते. मात्र आता ऋषी कुमार शुक्ला यांच्या नियुक्तीने सरकार पुन्हा सीबीआयची घडी बसवण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या एम. नागेश्वर राव यांच्याकडे सीबीआयचा हंगामी पदभार आहे. अंतर्गत वादाचा CBI ला फटका; तीन राज्यांनी घातली बंदी, इतरही हे पाऊल उचलण्याच्या मार्गावर

शुक्रवारी नव्या सीबीआय संचालक निवडीसाठी एक विशेष बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी जावेद अहमद, रजनीकांत मिश्रा, एसएस देसवाल आणि शिवानंद झा यांच्या नावांची शिफारस करण्यात आली होती. मात्र अखेर ऋषी कुमार शुक्ला यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.