काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम (P. Chidambaram) यांना काही दिवसांपूर्वी दिल्ली येथील राहत्या घरातून सीबीआय तर्फे अटक करण्यात आली होती. INX मीडिया घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होता. आज म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी त्यांना सीबीआय (CBI) च्या विशेष न्यायालयासमोर हजार करण्यात आले होते, मात्र तूर्तास न्यायालयाने याप्रकरणी निर्णय न देता चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीत वाढ केली आहे. यामुळे सध्या तरी चिदंबरम यांच्या मागील व्याप संपण्याची काहीच चिन्हे नाहीत. प्राप्त माहितीनुसार, त्यांना 30 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा सीबीआय विशेष कोर्टात उपस्थित करण्यात येईल.(पी चिदंबरम यांना अटक झाली ते INX मीडिया प्रकरण नक्की आहे तरी काय? जाणून घ्या घटनाक्रम)
ANI ट्विट
Special CBI court extends CBI remand of Former Union Minister P. Chidambaram by 4 days in connection with INX Media case. He will be produced before the court on 30th August. pic.twitter.com/sY9HxU69fi— ANI (@ANI) August 26, 2019
पी चिदंबरम यांनी अटकपूर्व जमिनीची मागणी दिल्ली उच्च न्यालयाने फेटाळून लावली होती, त्यानंतर त्यांनी थेट सुप्रीम कोरतात धाव घेतली मात्र तिथेही त्यांची निराशा झाली. परिणामी त्यांना चार दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती. हा तुरुंगवास संपून आज त्यांना विशेष न्यायालयात हजार करण्यात आले. यावेळी विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहर यांनी चिदंमबरम यांना चौकशी निमित्त आणखीन पाच दिवसांची कोठडी सुनावली.
दरम्यान, INX मीडिया घोटाळा प्रकरणात पी चिदंबरम यांच्यासह त्यांचे पुत्र कार्टी चिदंबरम यांचे देखील नाव समोर आले होते. 2007 साली युपीए सत्तेत असताना चिदंबरम अर्थमंत्री होते.याकाळी INX कंपनीमध्ये 4 कोटी 64 लाख इतक्या परदेशी गुंतवणुकीला मान्यता दिली मात्र मूळ गुंतवणूक 305 कोटी रुपयांची झाली. ही मोठी तफावत लक्षात येताच प्राप्तिकर खाते आणि महसूल विभागाने कंपनीला नोटेल बजावली. मात्र चिदंबरम यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून कंपनीला नव्याने गुंतवणुकीसाठी परवानगी मिळवून दिली असा आरोप लागवण्यात आला होता.