Internet Services Snapped in Delhi-NCR: राजधानी दिल्ली-एनसीआर परिसरात काही भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद
Internet Services Snapped in Delhi-NCR | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शेतकरी आंदोलकांनी (Farmers Protest) राजधानी दिल्लीमध्ये काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान (Tractor Rally) अभूतपूर्व गोंधळ झाला. आंदोलक शेतकरी आणि दिल्ली पोलीस यांच्यात मोठ्या प्रमाणावर संघर्ष झाला. या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर उपस्थित झाला. निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राजधानी दिल्ली आणि एनसीआर ( Delhi-NCR) परिसरातील इंटरनेट सेवा (Internet Services Snapped in Delhi-NCR) काही काळासाठी खंडीत करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार सिंघू, गाजीपूर, टिकरी, मुकरबा चौक, नांगलोई आणि आसपासच्या परिसरातील इंटरनेट सेवा 23:59 वाजेपर्यंत (म्हणजेच रात्री 11.59 पर्यंत) स्थगित करण्यात आली आहे.

दरम्यान, शेतकरी ट्रॅक्टर रॅली आणि दरम्यान झालेल्या गदारोळामुळे दिल्ली मेट्रो काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. (हेही वाचा, Rahul Gandhi On Farmers' Protest: आक्रमक शेतकरी आंदोलकांना राहुल गांधी यांचा सल्ला, ट्विट करत म्हटले 'हिंसा हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही')

मेट्रोलाईन बंद असलेली ठिकाणे

समयपुर बादली, रोहिणी सेक्टर 18-19, हैदरपुर बादली मोड, जहांगीरपुरी, आदर्श नगर, आजादपुर, मॉडल टाउन, जीटीबी नगर, विश्वविद्यालय, विधानसभा आणि सिविल लाइन्स मेट्रोचे प्रवेश द्वारा आणि बाहेर पडण्याचा मार्ग बंद. ग्रीन लाईन मेट्रोचे एण्ट्री आणि एक्जिट गेट बंद आयटीओ येथे पोलिसांकडून शेतकऱ्यांवर लाठीमार. ग्रीन लाईन मेट्रोचे एण्ट्री आणि एक्जिट गेट बंद. इंद्रप्रस्थ मेट्रो स्टेशनचे एण्ट्री आणि एक्झिट गेट बंद.

शेतकऱ्यांनी आयटीओ आणि त्यानंतर लालकिल्ल्यावर प्रवेश केला. शेतकऱ्यांनी लालकिल्ल्यात प्रवश केल्यावर गदारोळ माजला. दिल्ली आगोदर म्हटले होते की, दिल्लीच्या सर्व सीमा बंद आहेत. परंतू, काही वेळातच शेतकरी आंदोलन नियंत्रणाबाहेर गेले.दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गाजीपूर बॉर्डरजवळ शेतकऱ्यांनी बॅरीकेट्स तोडले. दुसऱ्या बाजूला अक्षरधाम नोएडा मोड परिसरात शेतकरी आणि दिल्ली पोलिसांमध्ये मोठी झटापट झाली. काही ठिकाणी किरकोळ हिंसेच्या घटनाही घडल्या. या वेळी काही ट्रक आणि गाड्यांचेही नुकसान झाले.