Interim Budget 2024: अंतरिम बजेट पूर्वी आज आर्थिक सर्वेक्षण नाही होणार सादर; जाणून घ्या असं का?
Budget-2024-25

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यंदा 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता लोकसभेमध्ये (Lok Sabha) अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget) मांडणार आहेत. दरम्यान अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey) जाहीर केले जाते. पण यंदाचा मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प लोकसभा निवडणूकीच्या वर्षातला असल्याने अंतरिम अर्थसंकल्प आहे. आणि अंतरिम अर्थसंकल्पामध्ये आर्थिक सर्वेक्षण सादर करण्याची रीत नाही. त्यामुळे आज 31 जानेवारी दिवशी देशात आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाणार नाही. नक्की वाचा: President Droupadi Murmu's Speech Today: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान भाषण, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे (Watch Video). 

आर्थिक सर्वेक्षण काय असते?

आर्थिक सर्वेक्षण हा केंद्रीय अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी केंद्राने सादर केलेला दस्तऐवज असतो. ज्यामध्ये सर्वसमावेशक वार्षिक अहवाल दिला जातो. जो गेल्या आर्थिक वर्षातील भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी दाखवतो. भविष्यातील चांगल्या वाईटाचा अंदाजही दर्शवतो.

अर्थसंकल्प सादरीकरणाच्या आदल्या दिवशी मुख्य आर्थिक सल्लागार (CEA) द्वारे आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते. मागील अर्थसंकल्पाचं काम कसं झालं यावर ते  प्रकाश टाकते आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी पुढे काय येऊ शकते यावर अंदाज व्यक्त केला जातो.

आज आर्थिक सर्वेक्षण का नाही? 

यंदाचा अर्थसंकल्प हा पूर्ण अर्थसंकल्प नसल्याने आर्थिक सर्वेक्षण नाही. वास्तविक 1 फेब्रुवारी रोजी कोणत्याही मोठ्या घोषणा किंवा धोरणातील बदल जाहीर केले जाणार नाहीत. कारण अर्थमंत्री निर्मला  सीतारामन 1 फेब्रुवारी 2024 ला  केवळ अंतरिम अर्थसंकल्प 2024 सादर करणार आहेत. आर्थिक सर्वेक्षण सादर होणार नसल्याने सरकार कडून “Indian Economy – A Review" सादर करण्यात आला. त्यामध्ये मागील 10 वर्षातील महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.  12 Lakh Jobs in India: भारतामध्ये 1.14 लाख स्टार्टअप्स मधून 12 लाख नोकर्‍यांची निर्माण झाली संधी - केंद्रीय अर्थमंत्रालयाची माहिती.

2024 मध्ये सलग तिसऱ्या वर्षी भारतीय अर्थव्यवस्थेत 7 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. यूके आणि अमेरिका नंतर जागतिक स्तरावर भारताची तिसरी सर्वात मोठी फिनटेक अर्थव्यवस्था असेल असा प्रयत्न असणार आहे.