Interest Waiver Scheme: बॅंकांकडून व्याजमाफी योजनेला सुरूवात; आजपासून ग्राहकांना मिळणार कॅशबॅक
Cash | (Archived, edited, representative images) (Photo Credits : IANS)

कोरोना संकटकाळामध्ये विस्कटलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रूळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. दरम्यान सध्या सणासुदीचा काळ पाहता सामान्यांचं अर्थकारण बिघडू नये म्हणून केंद्र सरकारने Interest waiver स्कीम सुरू केली आहे. त्यानुसार बॅंकांसोबतच इतर आर्थिक संस्थांकडून घेतलेल्या कर्जावरील व्याजाच्या माफीला मंजुरी दिल्यानंतर आजपासून (5 नोव्हेंबर) ती रक्कम ग्राहकांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरूवात झाली आहे. वैयक्तिक ग्राहकासोबतच लहान व्यावसायिकांनादेखील त्याचा फायदा मिळणार आहे. यामध्ये 2 कोटी पर्यंतच्या कर्जाच्या व्याजाची माफी दिली जाईल. moratorium चा पर्याय निवडलेल्यांप्रमाणे इतर कर्जदारांनादेखील या योजनेअंतर्गत मदत मिळणार आहे.

कोविड 19 आऊटब्रेक मध्ये आरबीआयने मार्च महिन्यात 3 महिन्यांसाठी क्रेडीट कार्ड आणि ईएमआयच्या हप्त्यामधून मुभा ग्राहकांना देण्याचा विचार करावा असे बॅंकांना सुचवलेहोते. नंतर हा काळ 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आला. नंतर सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाचं पालन करत केंद्र सरकारने 1 मार्च ते 31 ऑगस्ट दरम्यानच्या सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यामधील तफावत असलेली रक्कम कर्जदारांच्या खात्यात जमा करणार असल्याचं घोषित केले. त्यानुसार आता त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. EMI cashback: आनंदाची बातमी! लॉकडाऊन काळात कर्जाचा हप्ता भरला आहे? तर मग सज्ज रहा कॅशबॅक मिळविण्यासाठी; सरकारचे निर्देश

दरम्यान MSMEs कर्ज, शैक्षणिक कर्ज, घर कर्ज, क्रेडिट कार्डचा हप्ता, वाहन कर्ज, वैयक्तिक आणि प्रोफेशनल लोन यांचा या Interest waiver स्कीममध्ये समावेश आहे. दरम्यान मीडिया रिपोर्ट्सनुसार, या Interest waiver scheme मुळे सुमारे सरकारवर 6500 कोटींचा भार पडणार आहे.

भारतीय स्टेट बॅंकेची या Interest waiver स्कीम मध्ये नोडल एजंसी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार समितीकडून या स्कीमची मार्गदर्शक तत्वे काही दिवसांपूर्वी जारी करण्यात आली होती.