जर तुमच्या मुलांना लॉलीपॉप आणि कँन्डी खाण्याची सवय असेल तर आजच सावध व्हा. कारण सध्या काही ठिकाणी लॉलीपॉप आणि कँन्डी तयार करताना त्यात टॅल्कम पावडरचा वापर केला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही गोष्ट खरी असून एका फॅक्ट्रीत तयार ते तयार केले जात असताना सत्य समोर आले आहे. इंदौर येथील एका फॅक्ट्रीरीतील हा प्रकार असून टॅल्कम पावडरची लॉलीपॉप आणि कँन्डी मध्ये भेसळ केली जात असल्याचे सांगितले जात आहे.(Madhya Pradesh: मुरैना येथे विषारी दारू प्यायल्याने 10 जणांचा मृत्यू; तर 5 जणांची प्रकृती गंभीर)
लॉलीपॉप आणि कँन्डीमध्ये भेसळ करुन या काळ्या धंद्यातून अशा फॅक्ट्री मालकांना नफा होत असला तरीही तुमच्या मुलाचे आयुष्य धोक्यात टाकले जात आहे. इंदौर मध्ये खाद्य आणि औषध विभागाच्या टीमने पालदा मधील केएस इंडस्ट्रीजच्या कारखान्यावर छापेमारी केली. तेव्हा लहान मुलांना आवडणाऱ्या लॉलीपॉप आणि कॅंन्डीत टॅल्कम पावडर मिसळली जात असल्याचा खुलासा केला. यानंतर फॅक्ट्री मधून 4 हजार 200 किलो लॉलीपॉप आणि 5 हजार 500 किलो कँन्डी जप्त करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणी इंदौरचे अप्पर कलेक्टर अभय बेडेकर यांनी अधिक माहिती देत असे म्हटले की, छापेमारीदरम्यान त्यांना सफेद रंगाची पावडर मिळाली. त्याचा तपास केल्यानंतर ती टॅल्कम पावडर असल्याचे समोर येत लॉलीपॉप आणि कँन्डी मध्ये वापरली जात होती. त्यामुळे लॉलीपॉप आणि कँन्डी प्लेटवर चिटकून राहू नये म्हणून असे केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे.(Gujarat: ड्राय गुजरातमध्ये दारू पिणाऱ्या महिलांची संख्या दुपटीने वाढली, तर पुरुषांचे प्रमाण 50 टक्क्यांनी घटले- NFHS)
तर भेसळ करणाऱ्या या फॅक्ट्रीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या मते, फॅक्ट्रीत स्वच्छता सुद्धा केली जात नव्हती. अत्यंत घाणेरड्या ठिकाणी कॅंन्डी आणि लॉलीपॉप तयार केले जात होते. अनिल अग्रवाल आणि विजय सबनानी हे फॅक्ट्रीचे मालत असून त्यांच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकते. सध्या इंदौर मध्ये खाद्य विभागाकडून भेसळ आणि अनधिकृत फॅक्ट्रीच्या विरोधात अभियान चालवले जात आहे. या अभियानाअंतर्गत इंदौरमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वीच अनधिकृत फॅक्ट्री तोडण्यात ही आली होती.