Madhya Pradesh: मुरैना येथे विषारी दारू प्यायल्याने 10 जणांचा मृत्यू; तर 5 जणांची प्रकृती गंभीर
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Wikimedia Commons)

Madhya Pradesh: मध्य प्रदेश (Madhya Pradesh) मधील मुरैना (Morena) येथे विषारी दारू (Poisonous Liquor) प्यायल्याने 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सात जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. वृत्तानुसार, मुरैना जिल्ह्यातील दोन पोलिस स्टेशन भागात विषारी दारूमुळे बरेच लोक गंभीर आजारी आहेत. आतापर्यंत यातील दहा जणांचा मृत्यू झाला आहे. काहींची प्रकृती अतिशय गंभीर आहे. या सर्वांना मुरैना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एसपी अनुराग सुजानिया (Anurag Sujania) यांनी सांगितलं की, मुरैना येथे विषारी मद्यपान केल्यामुळे 10 लोकांचा मृत्यू झाला असून 5 लोक आजारी पडले आहेत. एसडीओपी सुजित भदोरिया म्हणाले की, तपासणीनंतरचं मृत्यूचे कारण कळू शकेल. पोलिस सध्या चौकशी करत आहेत. (वाचा - Madhya Pradesh: मध्य प्रदेशमध्ये विधवा महिलेवर निर्भयासारखे क्रौर्य; सामूहिक बलात्कारानंतर प्रायव्हेट पार्टमध्ये टाकला रॉड)

ओपी केमिकलपासून बनविलेले मद्यपान केल्यामुळे सर्व लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. विषारी दारूचं सेवन केल्याने काहीजण गंभीर आजारी आहेत. त्यांना ग्वाल्हेर येथे उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

दरम्यान, 8 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यातील सिकंदराबाद पोलिस स्टेशन परिसरातील जीतगढ़ी गावात विषारी दारूचे सेवन केल्यामुळे 5 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर 16 जण आजारी पडले होते. या प्रकरणात स्टेशन प्रभारीसह चार पोलिस कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले होते. याशिवाय उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक व तीन शिपायांना निलंबित करून अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती.