IndiGo Flight | (Photo Credit - ANI/X)

IndiGo Mumbai International Routes: मुंबई - मध्य आशियातील (IndiGo Central Asia Routes) आपली व्यावसायिक हिस्सेदारी मजबूत करण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल उचलत, भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी, इंडिगोने (IndiGo Mumbai Flights) मुंबई ते अल्माटी, ताश्कंद आणि तिबिलिसी थेट आंतरराष्ट्रीय उड्डाणे (Almaty Tashkent Tbilisi Flights) सुरू करण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानच्या हवाई हद्दीच्या सतत बंदीमुळे दिल्लीहून सेवा निलंबित केल्यानंतर एअरलाइनच्या आंतरराष्ट्रीय कामकाजात हा एक लक्षणीय बदल आहे.

उड्डाणांची सुरुवात 1 जुलैपासून , आठवड्यातून अनेक सेवा

IndiGo कडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, 1 जुलैपासून मुंबई–अल्माटी मार्गावर सेवा सुरू होणार असून, 1 ऑगस्टपासून मुंबई–ताशकंद आणि 2 ऑगस्टपासून मुंबई–टिबिलिसी मार्गावरही उड्डाणे सुरू होतील. अल्माटी आणि ताशकंदसाठी दर आठवड्याला चार उड्डाणे, तर टिबिलिसीसाठी तीन उड्डाणे IndiGo संचलित करणार आहे. (हेही वाचा, IndiGo च्या Chennai-Kolkata विमानात टेक ऑफपूर्वी प्रवाशाचा मृत्यू)

दिल्लीच्या जागी आता मुंबईकडे कल

दिल्लीमार्गे उड्डाणांवर निर्बंध आल्यामुळे आणि हवाई मार्ग लांब झाल्यामुळे IndiGo ने आता मुंबईवर लक्ष केंद्रीत केले आहे. IndiGo चे ग्लोबल सेल्स प्रमुख विनय मल्होत्रा म्हणाले, “दिल्ली–मध्य आशिया मार्गांवर मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर आम्ही आता मुंबईहून अल्माटी, ताशकंद आणि टिबिलिसी यांसारख्या शहरांसाठी थेट सेवा सुरू करत आहोत. हे आमचे जागतिक कनेक्टिव्हिटीसाठीचे योगदान अधिक बळकट करेल.”

दिल्ली–टिबिलिसी मार्ग लांबला, अन्य सेवा बंद

पाकिस्तानच्या हवाई हद्दीतील बंदीमुळे दिल्ली–टिबिलिसी फ्लाइटसाठी सुमारे 45 मिनिटांचा अतिरिक्त वेळ लागतो. तर दिल्लीहून अल्माटी आणि ताशकंदसाठीची उड्डाणे 27 एप्रिलपासून बंद करण्यात आली आहेत.

मुंबई एक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनतेय

या निर्णयामुळे मुंबई हे शहर मध्य आशियाशी जोडणाऱ्या आंतरराष्ट्रीय मार्गांसाठी एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत आहे. विशेषतः व्यवसायिक आणि पर्यटनासाठी या नवीन उड्डाणांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

IndiGo च्या नव्या फ्लाइट्सच्या बरोबरीने, कझाकिस्तानची राष्ट्रीय विमानसेवा Air Astana नेही मुंबई–अल्माटी मार्गावर आठवड्यातून तीन उड्डाणांची सेवा सुरू केली आहे. याआधी Air Astana दिल्लीतून अल्माटीसाठी सप्ताहात 11 उड्डाणे चालवत होती आणि आता मुंबई हे तिचे दुसरे भारतीय गंतव्य ठरले आहे.

भारत–मध्य आशिया हवाई संपर्क बळकट

या नव्या मार्गांमुळे भारत आणि मध्य आशिया यांच्यातील व्यापार, पर्यटन आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होतील. मुंबईकरांसाठी ही एक मोठी संधी असून ते आता अल्माटी, ताशकंद आणि टिबिलिसीसारख्या पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांशी थेट जोडले जातील. IndiGo कडून मुंबईहून अशा थेट सेवा वाढवणे ही जागतिक पातळीवर भारताची उपस्थिती मजबूत करण्याच्या दृष्टीने मोठी पावले ठरत आहेत.