
(IndiGo) च्या चैन्नई-कोलकाता विमानात टेक ऑफ़ पूर्वीच एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान इंडिगोचं विमान या दुर्देवी घटनेमुळे उशिराने उडालं. विमान कंपनीकडून प्रवाशाच्या मृत्यूच्या घटनेची पुष्टी करण्यात आली आहे पण त्यांनी प्रवाशाची ओळख सांगितलेली नाही. सगळ्या प्रवाशांना तातडीने विमानातून उतरवण्यात आले. नंतर संपूर्ण विमान पुन्हा स्वच्छ करून दीड तास उशिराने आकाशात झेपावलं. ही सोमवार 2 जून ची घटना आहे.
सोमवारी 2 जून दिवशीच रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावर इंडिगोच्या एका विमानाला पक्षी धडकल्याने आणि आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्याची अजून एक घटना समोर आली आहे. या विमानामध्ये सुमारे 175 प्रवासी होते. सारे जण सुरक्षित आहेत. मात्र पक्षी धडकल्याने विमानाला 'डेंट' आल्याचा प्रकार समोर आला आहे. हे Airbus 320,विमान असून ते पाटना ते कोलकाता रांची मार्गे प्रवास करून पुढे गेले आहे.
विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, विमान सकाळी 11.55 वाजता रांची येथे लँडिंगची तयारी करत असताना पक्ष्याची धडक बसली. वैमानिकाने लँडिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि आघाताचे मूल्यांकन करण्यासाठी आकाशात घिरट्या घालत राहिला आणि नंतर आपत्कालीन लँडिंगसाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, जो यशस्वीरित्या पार पडला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.