भारतात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) फैलाव इतका झपाट्याने पसरत चालला आहे की त्याला आटोक्यात आणण्यासाठी आणि त्यावर यशस्वी लस बनविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. भारतात मागील 24 तासांत 82,170 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 60 लाख 74 हजार 703 वर (Coronavirus Positive Cases) पोहोचली आहे. यात केंद्र आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने (Health Ministry of India) माहितीनुसार देशात मागील 11 दिवसांत 10 लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 50 लाखाहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 50 लाख 16 हजार 521 वर (Coronavirus Recovered Cases) पोहोचली आहे.
गेल्या 11 दिवसांत कोरोना बाधित बरे झाल्याचे प्रमाण हे सर्वाधिक असून यातून सरकारचे सुरु असलेले प्रयत्न दिसून येत आहे. तर दुसरीकडे गेल्या 24 तासांत 1039 रुग्ण दगावले असून आतापर्यंत एकूण 95 हजार 542 रुग्णांचा मृत्यू (Coronavirus Death Cases) झाला आहे. सद्य घडीला देशात 9 लाख 62 हजार 640 रुग्णांवर (Coronavirus Active Cases) उपचार सुरु आहे. भारतात 27 सप्टेंबरपर्यंत 7,19,67,230 कोविड-19 चाचण्या झाल्या असून काल दिवसभरात 7 लाख 9 हजार 394 नमुने तपासण्यात आले असे ICMR कडून सांगण्यात येत आहे.
India's total recoveries cross 50 lakh mark. The last 10 lakh recoveries were added in just 11 days: Union Ministry of Health and Family Welfare #COVID19 pic.twitter.com/QwxILBybqV
— ANI (@ANI) September 28, 2020
जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) धुमाकूळ घातला असून जगात कोरोना बाधितांची संख्या 3 कोटीच्या पार गेली आहे. तर मृतांचा आकडा 9 लाखांच्या पार गेला आहे. मात्र यात कोरोना बाधितांचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारत (India) दुस-या स्थानावर आहे. मात्र आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रुग्ण बरे होण्याच्या यादीत भारत अव्वल स्थानावर असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतात इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण बरे झाले आहेत.