Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

देशातील कोरोना व्हायरसचा (Coronavirus) कहर सुरुच आहे. कोरोना बाधित रुग्णांची दिवसागणित पडणारी मोठी भर यामुळे देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने 9 लाखांचा टप्पा पार केला आहे. मागील 24 तासांत 28,498 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 553 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या वाढीमुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 9,06,752पोहचला आहे. त्यापैकी 3,11,565  अॅक्टीव्ह केसेस (Active Cases) आहेत. म्हणजेच इतक्या रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 5,71,460 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान देशात एकूण 23,727 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिली आहे.

देशातील कोरोना बाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जगभरातील कोरोना बाधित देशांच्या क्रमावारी भारत तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. दरम्यान कोरोना संसर्गातून रिकव्हर होणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे देशाची रिकव्हरी रेट सातत्याने सुधारत असून 63.02% वर पोहचला आहे. तर देशाची रिकव्हरी रेट आणि मृत दर याचा रेशो 96.01%:3.99% इतका आहे. अशी माहिती भारत सरकारने दिली आहे. दरम्यान, रिकव्हरी रेट चांगला असला तरी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. (महाराष्ट्रात आज 6,497 नवे कोरोना रुग्ण, 193 मृत्यू; कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2,60,924 वर)

ANI Tweet: 

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या संकट अद्याप दाट आहे. कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूंचा अधिक संसर्ग असलेली ठिकाणं पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात येत आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई ही शहरं लॉकडाऊन करण्यात आली असून आजपासून पुण्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.