
Sleep Issues And Student Well-being: भारतीय विद्यार्थी आणि महिला यांना मोठ्या प्रमाणावर झोपेची समस्या सतावत आहे. ज्यामुळे मानसिक आरोग्य (Mental Health) धोक्यात आल्याचेही पुढे आले आहे. अनेकांना तर निद्रानाश आणि तत्सम विकार झाल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे. आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या (Aditya Birla Education Trust) युनिट एमपॉवरने केलेल्या या पाहणीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. ज्यामध्ये म्हटले आहे की, साधारण 18 ते 25 या वयोगटातील जवळजवळ दोन विद्यार्थ्यांपैकी एक जण, हलक्या ते मध्यम झोपेच्या अडचणींशी झुंजतो. यात महिला (78.5%) पुरुषांपेक्षा जास्त प्रभावित होतात. या संशोधनातून झोपेच्या समस्या, एकटेपणा (Loneliness) आणि शैक्षणिक ताण यांच्यातील परस्पर सहसंबंध अधोरेखित झाला आहे.
झोपेची समस्या आणि तणाव
आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या युनिट एमपॉवरने केलेल्या अभ्यासात विविध निष्कर्ष काढण्यात आले. ज्यामध्ये झोपेची समस्या, निद्रानाश आणि विद्यार्थी आणि महिला यांच्या मनात असलेला ताण-तणाव अशा विविध पैलुंवर भाष्य करण्यात आले. हे पौलू खालील प्रमाणे:
- झोपेच्या गंभीर अडचणी: 10% विद्यार्थ्यांनी तीव्र निद्रानाश नोंदवला, त्यापैकी दोन तृतीयांश महिला आहेत.
- एकटेपणा आणि सामाजिक अलिप्तता: 41% विद्यार्थ्यांनी सांगितले की त्यांचे सामाजिक वर्तुळ खूप मर्यादित आहे, तर 31% विद्यार्थ्यांनी शून्यतेची सामान्य भावना (एकटेपणा) जाणवल्याचे आणि पुरेशी झोप होत नसल्याचे सांगितले.
- तणावाशी संबंध: झोपेच्या अडचणी अनुभवणाऱ्या 52% विद्यार्थ्यांनी उच्च ताण पातळी नोंदवली, तर 47% एकाकी विद्यार्थ्यांना वाढत्या ताणाचा सामना करावा लागला. (हेही वाचा, Mumbai Sleep Scorecard Report: धक्कादायक! 32% मुंबईकर करत आहेत झोपेशी संबंधीत आजारांचा सामना; रात्री उशीरपर्यंत जागरण आरोग्यासाठी घातक)
लोकसंख्याशास्त्रीय ट्रेंड:
- सर्वा
विद्यार्थ्यांसाठी आवश्यक मानसिक आरोग्य आणि उपाय
आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीरजा बिर्ला यांनी विद्यार्थ्यांसाठी सुलभ मानसिक आरोग्य उपायांच्या गरजेवर भर दिला. हा भर देताना त्यांनी सांगितले की, हा अभ्यास तरुणांमध्ये झोप, मानसिक आरोग्य आणि एकाकीपणा यांच्यातील परस्परसंवादाची पुष्टी करतो. मानसिक आरोग्य सेवा अधिक सुलभ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ट्रस्ट सध्या विद्यार्थ्यांसाठी स्क्रीनिंग, समुपदेशन आणि सुरक्षित जागा प्रदान करण्यासाठी महाविद्यालयांसोबत काम करत आहे. शैक्षणिक संस्थांमधील अभ्यासक्रमात मानसिक आरोग्य शिक्षण समाविष्ट करण्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले. (हेही वाचा, Loneliness Impacts Men's Lives and Work: पुरुषांच्या काम आणि जीवनावर एकाकीपणा परिणामकारक; संशोधनात अनेक धक्कादायक खुलासे)
अहवालातील शिफारसी
विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी अहवाल खालील पर्याय सुचवतो:
- विद्यार्थी विमा कव्हरमध्ये मानसिक आरोग्य सेवांचा समावेश करणे.
- मानसिक आरोग्य व्यावसायिकांचे देशव्यापी नेटवर्क स्थापन करणे.
- समुपदेशन कक्ष आणि संरचित संदर्भ मार्गांची स्थापना करणे.
- केंद्र, राज्य आणि संस्थात्मक पातळीवर समर्पित मानसिक आरोग्य बजेट वाटप करणे.
- विद्यार्थ्यांमधील मानसिक आरोग्य कलंक दूर करणे
दरम्यान, हा अभ्यास विद्यार्थ्यांमधील वाढत्या मानसिक आरोग्याच्या चिंतांवर प्रकाश टाकतो, विशेषतः एकाकीपणा आणि शैक्षणिक दबावाचा त्यांच्या भविष्यावर होणारा परिणाम. शैक्षणिक संस्थांमध्ये लवकर हस्तक्षेप, जागरूकता कार्यक्रम आणि संरचित समर्थन प्रणालींची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञ सांगतात.