Railway | Image used for representational purpose | (फोटो सौजन्य-फेसबुक)

Indian Railway:  देशात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी होण्यासह भारतीय रेल्वेच्या गाड्यांच्या संख्येत वाढ करण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाउन हळूहळून अनलॉक करण्याच्या प्रक्रियेसह प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वेकडून काही गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. रेल्वेच्या मते, उत्तर प्रदेश आणि बिहार मधील लोकांची सुविधा पाहता गोरखपुर-पनवेल, दिल्ली-गोरखपूर तसेच छपरा-पनवेल या दरम्यान समर स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय रेल्वेकडून 6,7 आणि 12 जून रोजीपासून 6 समर स्पेशल ट्रेन चालविल्या जाणार आहेत. या ट्रेन्स उत्तर प्रदेशातील झासी, कानपुर, लखनौ, प्रयागराज, वाराणसी, सीतापुर, बलिया सारख्या शहरांमधून जाणार आहेत. उत्तर रेल्वेनुसार या समर स्पेशल ट्रेन पूर्णपणे आरक्षित असणार आहेत.(Central Government On Twitter: नवे डिजिटल नियम लागू करा अन्यथा परिणामांना सामोरे जा; केंद्र सरकारचा ट्विटरला निर्वाणीचा इशारा) 

Tweet:

तसेच पश्चिम रेल्वेच्या मते, प्रवाशांची वाढती संख्या पाहता काही स्पेशल ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि बिहार येथील ट्रेनचा समावेश आहे. या गाड्या वांद्रे, अहमदाबाद, छपरा, मऊ, समस्तीपुर, गुवाहाटी, राजकोटसह काही शहरांमध्ये धावणार आहेत.(Konkan Railway Recruitment 2021: कोकण रेल्वेमध्ये अकाउंट्स असिस्टंटसह सेक्शन ऑफिसर पदासाठी नोकर भरती, 1 जुलै पर्यंत करता येईल अर्ज)

Tweet:

या व्यतिरिक्त बंगाल-बिहार आणि युपी ते जम्मूकडे येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक उत्तम बातमी आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी कोलकाता आणि जम्मूतवीच्या मध्य 031151/03152 कोलकाता-जम्मूतवी-कोलकाता स्पेशल ट्रेन 8 जून पासून पुढील आदेशापर्यंत सुरु केली जाणार आहे. कोरोनामुळे या ट्रेन बंद करण्यात आल्या होत्या.