Konkan Railway Recruitment 2021: जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे, कारण कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी नोकर भरती करण्यात येणार आहे.त्यानुसार कोकण रेल्वेत असिस्टंट अकाउंट्स, अकाउंट्स असिस्टंट आणि डेप्युटी जनरल मॅनेजर फायनान्समध्ये नियुक्ती केली जाणार आहे. एकूण 11 पदांसाठी योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत.(RRC Western Railway Recruitment 2021: अप्रेंटिसच्या 3591 पदांसाठी नोकर भरती, उमेदवारांना rrc-wr.com येथे अर्ज करता येणार)
कोकोण रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशन नुसार, 7 असिस्टंट अकाउंट्स ऑफिसरच्या 2 सेक्शन ऑफीसरसाठी सुद्धा 2 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. या व्यतिरिक्त जनरल मॅनेजर फायनान्स मध्ये 1 पदावर नोकर भरती केली जाईल. अशातच इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट konkanrailway.com वर जाऊन पूर्ण डिटेल्स नोटिफिकेशन पाहू शकता. त्यानंतर तुम्ही नोकरीसाठी अर्ज करु शकता. अर्ज करतेवेळी उमेदवाराने लक्षात ठेवावे की अंतिम तारीख 1 जूलै असून त्यानंतर कोणतेही अर्ज स्विकारले जाणार नाही.
-वयाची अट
>> अकउंट्स असिस्टंट- 35 वय
>> असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर-35 वय
>>सेक्शन ऑफिसर- 40 वर्ष
>>डेप्युटी जनरल मॅनेजर फायनान्स-45 वय
अकाउंट्स असिस्टंट पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून बीकॉमची डिग्री घेतलेली असावी. या व्यतिरिक्त अकाउंट्स सेक्शनमध्ये तीन वर्षांचा अनुभव असावा. तसेच असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर पदासाठी सीएमए आणि सीएची डिग्री असावी. सेक्शन ऑफिसरसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून बीकॉम डिग्री घेतलेली असावी. डेप्युटी जनरल मॅनेजर फायनान्ससाठी सीएमए आणि सीए असावे.