RRC Western Railway Recruitment 2021 : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण वेस्टर्न रेल्वे, रेल्वे रिक्रूटमेंट सेलने अप्रेंटिसच्या पदासाठी नोकर भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. त्यानुसार ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 25 मे पासून सुरु झाली असून अंतिम तारीख 24 जून 2021 आहे. त्यामुळे या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी RRC ची अधिकृत वेबसाइट https://rrc-wr.com/ येथे जाऊन ऑनलाईन अर्ज करावा.
वेस्टर्न रेल्वे रिक्रुटमेंट सेलच्या विविध विभागात एकूण 3591 पदांसाठी नियुक्ती केली जाणार आहे. त्यानुसार इलेक्ट्रिशन, इलेक्ट्रॉनिक मॅकानिक, पेंटर, पाइप फिटर, प्लंबर, ड्राफ्ट्समॅन, वेल्डर, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेटर एसी मेकॅनिक सारख्या पदांवर निवड केली जाणार आहे.(LIC Associate Recruitment 2021: भारत जीवन बीमा निगम मध्ये नोकरीची संधी, 9 लाखांपर्यंत पगार; lichousing.com वर 7 जून पर्यंत करा अर्ज)
महत्वाच्या तारखा-
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख- 25 मे 2021 (सकाळी 11 वाजल्यापासून सुरु)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख- 24 जून 2021 (संध्याकाळी 5 वाजेपर्यंत)
येथे होणार नियुक्ती-
मुंबई विभाग (एमएमसीटी)- 738
वडोदरा (बीआरसी) विभाग- 489
अहमदाबाद विभाग(एडीआय)- 611
रतलाम मंडळ (आरटीएम)-434
राजकोट विभाग (आरजेटी)-176
भावनगर वर्कशॉप (बीवीपी) - 210
लोअर परेल (पीएल) डब्ल्यू/शॉप - 396
महालक्ष्मी (एमएक्स) डब्ल्यू/शॉप - 64
भावनगर (बीवीपी) डब्ल्यू / शॉप - 73
साबरमती (एसबीआई) इंजीनियरिंग डब्ल्यू/शॉप, अहमदाबाद - 60
हेडक्वार्टर ऑफिस- 34
तर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रथम फॉर्म नीट वाचून घ्यावा. कारण अर्ज करताना चूक झाल्यास तो मान्य केला जाणार नाही आहे. तसेच अंतिम तारखेपूर्वी अर्ज करण्याची सूचना दिली गेली आहे. त्यामुळे अंतिम तारखेनंतर कोणत्याही उमेदवाराचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे.