Railways | Representational Image | (Photo Credits: ANI)

भारतीय रेल्वेकडून (Indian Railway) लवकरच असा एक नवा निर्णय घेणार आहे ज्याचा थेट परिणाम दररोज ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर होऊ शकतो. खरंतर रेल्वेमध्ये रात्रीच्या वेळेस मोबाईल फोन किंवा लॅपटॉप चार्जिंग करण्यास बंदी असण्याचे निर्देशन रेल्वेकडून जाहीर केले जाऊ शकतात. कारण काही ट्रेनमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्याचे दिसून आल्याने रेल्वेकडून हा निर्णय घेतला जाणार आहे.(KFC India: केएफसी इंडिया आपल्या शाखांचे नेटवर्क आणखी वाढविण्याच्या तयारीत)

रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नुसार, रात्री ट्रेनध्ये मोबाईल चार्ज करण्याची सुविधा बंद करण्याच्या निर्णयासंबंधित जपून पाऊल उचलले जात आहे.एका रिपोर्टमध्ये रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असा दावा केला आहे की मोबाईल चार्ज किंवा अन्य इलेक्ट्रिक उपकरणे चार्जिंग करण्यासाठी वापरले जाणारे स्विच रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवले जाणार आहेत.

दरम्यान, देहरादूनला जाणाऱ्या शताब्दी एक्सप्रेसच्या एका कोचमध्ये 13 मार्चला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर काही दिवसांनी रांची मध्ये सुद्धा मालगाडीच्या इंजिनमध्ये आग लागली होती. त्यामुळे सुरक्षा उपयांसंबंधित झालेल्या आढावा बैठकीनंतर रेल्वेकडून एक विधान जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, मंत्र्यांनी असे म्हटले सुरक्षा हे रेल्वेचे मुख्य उद्दीष्ट आहे त्यामुळे याकडे कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष केले जाणार नाही. गाड्या चालवण्यासाठी सर्व सुरक्षा उपाय आणि पुन्हा तपासणची आवश्यकता असते.(Western Railway ची महत्त्वाची घोषणा! सणासुदीच्या काळात विशेष रेल्वेच्या 11 जोड्यांच्या फे-या वाढवणार)

या व्यतिरिक्त रेल्वेमध्ये धुम्रपान केल्यास व्यक्तीवर कारवाई केली जाणार आहे. तर रेल्वेत ज्वलनशील वस्तू घेऊन जाण्यास रेल्वे अधिनियमातील कलम 164 अंतर्गत दंडनीय अपराध आहे. अपराधीला तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा 1 हजार रुपयांचा दंड किंवा दोन्ही पद्धतीने कारवाई केली जाऊ शकते.