रेल्वेमध्ये नाश्ता पासून ते जेवणाच्या किंमती वाढणार असल्याने सामान्यांच्या खिशाला कात्री
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

रेल्वेने प्रवास करताना त्यादरम्यान भुक लागतेच. अशावेळी रेल्वेमध्ये त्यांचेच कर्मचारी नाश्ता पासून ते जेवणाचे विविध प्रकार प्रवाशांना पुरवातात. तर रेल्वेत विक्री करण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांसाठी ठराविक दर प्रवाशांकडून घेण्यात येतात. मात्र आता रेल्वेमध्ये नाश्ता ते जेवणाच्या किंमतीत अधिक वाढ होणार असल्याने सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे. तर रेल्वे बोर्डाच्या पर्यटन आणि अन्नपदार्थ विभागाने निर्देशन देत जाहीर करण्यात आलेल्या एका पत्रकानुसार राजधानी, शताब्दी आणि दुरांतो एक्सप्रेसमध्ये चहा, नाश्ता आणि जेवण यांच्या दरात वाढ करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या रेल्वेची तिकिट घेतल्यास तेथेच प्रवाशाला नाश्ता पासून ते जेवणाच्या पदार्थांचे पैसे द्यावे लागतात. तर दुसऱ्या रेल्वेत प्रवाशांना तिकिटांच्या रक्केमुळे तोंडचे पाणी पळते.

रेल्वे प्रशासाने नाश्ता ते जेवणाचे नवे दर दुरांतो आणि शताब्दी एक्सप्रेसमध्ये लागू केल्याने सेकंड एसी कोचच्या प्रवाशांना चहा 10 रुपयांऐवजी 20 रुपयांना मिळणार आहे. तर स्लीपर क्लासच्या प्रवाशांना 15 रुपये द्यावे लागणार आहेत. दुरांतोच्या स्लीपर क्लासमध्ये नाश्ता किंवा जेवण 80 रुपयांना मिळत होते ते आता 120 रुपयांना मिळणार आहे. त्याचसोबत संध्याकाळची चहाच्या किंमती 20 रुपयांवरुन 50 रुपये होण्याची शक्यता आहे.(खुशखबर! रेल्वेत 10 वी पास युवकांसाठी सरकारी नोकरीची संधी; जाणून घ्या कुठे कराल अर्ज आणि महत्वाच्या तारखा)

तिकिटांच्या सिस्टिममध्ये हे नवे नियम आणि नवे मेन्यू 15 दिवसात अपडेट करण्यात येणार आहेत. तसेच चार महिन्यानंतर अन्नपदार्थांचे नवे दर रेल्वेमध्ये लागू करण्यात येणार आहेत. तर राजधानीच्या फर्स्ट एसी कोचमध्ये जेवण 145 रुपयांऐवडी 245 रुपयांना मिळणार आहे. या नव्या दरामुळे सामान्यांना चांगलाच फटका बसला आहे. त्याचसोबत मांसाहारी जेवणात देण्यात येणारी चिकन बिर्याणी 90 रुपयांवरुन 110 रुपये दराने विकली जाणार आहे. रेल्वे बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने याबाबत अधिक माहिती देत असे म्हटले की, आम्हाला रेल्वेच्या कॅटरिंग सर्विसचा दर्जा अधिक उत्तम करायचा आहे. त्यामुळेच आम्ही अन्नपदार्थांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.