प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

गेल्या काही काळापासून बँकिंग क्षेत्रात होणाऱ्या फसणूकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे या गोष्टीवर आळा घालण्यासाठी बँकांकडून वेळोवेळी सुचना दिल्या जातात. तर दोन वर्षांपूर्वी आरबीआयकडून (RBI) बँकांना त्यांच्या ATM कार्डमध्ये बदलाव करण्याचे आदेश दिले होते. यावर बँकांनी अंमलबजावणी करत कार्डमध्ये बदल करण्यास सुरुवात केली. मात्र सध्या ज्या ग्राहकांनी त्यांचे एटीएम कार्ड बदलले नाहीत त्यांना 31 जानेवारी पर्यंत कालावधी देण्यात आला आहे.

खरंतर, इंडिया पोस्ट म्हणजेच भारतीय पोस्ट यांनी ग्राहकांना एक महत्वपूर्ण सूचना दिली आहे. त्यानुसार अलर्ट देत असे म्हटले आहे की, ग्राहकांनी त्यांचा मोबाईल क्रमांक अपडेट करणे आणि 31 जानेवारी पर्यंत जुन्या एटीएम कार्डला नव्या EVM चीप आधारित कार्ड घेण्यास सांगितले आहे. जर असे न केल्यास जुन्या एटीएम कार्डमधून ग्राहकांना पैसे काढणे मुश्किल होणार आहे. यातच तुम्ही सुद्धा भारतीय पोस्टचे एटीएम वापरत असाल तर आजच नजीकच्या पोस्ट ऑफिस शाखेत जाऊन ते बदलून घ्यावे असे सांगण्यात आले आहे. यानंतर नवे कार्ड ग्राहकांना देण्यात येणार आहेत. ग्राहकांकडून या कार्डसाठी कोणतेही पैसे वसूल केले जाणार नाही आहेत. तोपर्यंत मोबाईल क्रमांक अपडेट करणे अत्यावश्यक असल्यचे म्हटले आहे. (IRCTC ALERT: रेल्वेचे टूर पॅकेजेस बुकिंग करताना नकली वेबसाइटवरून होतेय फसवणूक; अशी घ्या काळजी)

देशभरात भारतीय डाक यांच्याकडून बचत खात्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते. यामध्ये कमीत कमी 500 रुपये टाकून खाते सुरु करता येते. या खात्यासाठी चेक बुक आणि एटीएमसह अन्य सुविधा पुरवल्या जातात. नॉनचेक बचत खाते अवघ्या 20 रुपयात सुरु करता येणार आहे. हे खाते देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करता येणार आहे.