IRCTC. (Photo Credit: File Photo)

इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉरपरेशन म्हनजेच आयआरसीटीसी (IRCTC) तर्फे प्रवाशांसाठी एक अलर्ट जरी करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून टूर बुकिंगच्या नावाखाली प्रवाशांची फसवणूक होण्याचे अनेक प्रसंग समोर आले होते, त्यामुळे प्रवाशांनी सुरक्षेसाठी अनधिकृत वेबसाईटचा वापर करणे टाळावे अशी सूचना देण्यात आली आहे. आईआरसीटीसी च्या नावाच्या (irctc.co.in) या अनधिकृत वेबसाइटवरून हा सर्व फसवणुकीचा प्रकार घडत आहे. या  नकली वेबसाईटमध्ये आणि अधिकृत वेबसाइट मध्ये दर्शनीय असे फरक फार कमी आहेत मात्र त्याकडे लक्ष न दिल्यास ग्राहकांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. IRCTC च्या वेबसाईटवर ऑनलाईन रिजर्व्हेशन चार्ट कसा पहाल?

प्राप्त माहितीनुसार, आईआरसीटीसी च्या आयटी विभागाकडे या फसवणुकीच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. या तक्रारी नोंदवून घेऊन सध्या त्यांचा तपास केला जात आहे. या फ्रॉड वेबसाइटपैकी एका साईटची ओळख पटलेली आहे. या साईटचे नाव irctctour.com आहे, विशेष म्हणजे बुकिंग नंतर साईटवरून देण्यात येणारे व्हाउचर्स हे अधिकृत व्हाउचर्स शी अगदी मिळतेजुळते आहे. याशिवाय 9999999999 हा मोबाइल क्रमांक, +91 6371526046 हा टेलिफोन क्रमांक, आणि irctctours2020@gmail.com या मेल आयडीवरून हा सगळा खोटा व्यवहार सुरु आहे. या पैकी कोणत्याही माध्यमातून आपल्याशी संपर्क झाल्यास त्वरित याबाबत रेल्वेकडे तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

आईआरसीटीसी या भारतीय रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत साईटवर म्हणजेच www.irctctourism.com वरच प्रवाशांनी रेल्वे व हवाई यात्रा पॅकेजेस आणि क्रूज पॅकेजेस माहिती मिळवावी आणि बुकिंग करावे असे देखील रेलेवंतर्फे सूचित करण्यात आले आहे.