Indian Army | Representational Image | (Photo Credits: PTI)

जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) मधील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टर (Keran Sector) मध्ये भारतीय जवानांच्या सर्तकतेमुळे पाकिस्तानाचे मनसुबे उधळून लावल्यात यश आले आहे. एलओसी (LOC) वर पाकिस्तानकडून (Pakistan) आलेले एक कॉडकॉप्‍टर (Quadcopter) घोंगावत होते. भारतीय जवानांनी ते निकामी केले. पाकिस्तानी सेनेच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपचे हे कॉडकॉप्टर होते. ANI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 8 च्या सुमारास भारतीय जवानांकडून ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर हा कॉडकॉप्टर भारताच्या हद्दीत 70 मीटर अंतरावर पडला.

निकामी करण्यात आलेले क्वाडकॉप्टर चिनी कंपनी डीजेआई माविक 2 प्रो मॉडलने (DJI Mavic 2 Pro Model) तयार केलेले होते. क्वाडकॉप्टर हे अनमैंड एरियल व्‍हीकल (UAV) किंवा ड्रोन सारखे असते. याचा वापर भारताची हेरगिरी किंवा सामान पाठण्यास करण्यात येतो. (PoK मधून नदीमार्फत हत्याऱ्यांची तस्करी करणाऱ्या दहशतावाद्यांचा कट भारतीय लष्कराने उधळला; मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा जप्त)

ANI Tweet:

अलिकडेच आलेल्या IANS च्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानने एका चायनीज कंपनीकडून मोठ्या प्रमाणात हेक्झाकोप्टर्स विकत घेतले आहेत. चीन आणि पाकिस्तान मधील आर्थिक व्यवहारातून ही देवाण-घेवाण झाली आहे, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. परंतु, या हेक्झाकोप्टर्स वापर करुन जम्मू-काश्मीर मध्ये हत्याऱ्यांची तस्करी करण्याचा पाकिस्तानचा मानस आहे. त्याचप्रमाणे Intelligence  Agency च्या माहितीनुसार पाकिस्तानकडून ड्रोनच्या साह्यायाने सुद्धा हत्याऱ्यांची तस्करी होवू शकते.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या भारतीय जवानांना एका नवीन मॉड्युलची ट्रेनिंग देण्यात येत आहे. या मॉड्युल अंतर्गत ड्रोन निकामी करण्याचे ट्रेनिंग जवानांना दिले जात आहे. त्याचप्रमाणे सीमा क्षेत्रातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सेनेकडून काही ड्रोन सोडण्यात आले आहेत.