जम्मू-काश्मिर मध्ये बडगाम येथे मिग विमान कोसळले
जम्मू-काश्मिर मध्ये बडगाम येथे मिग विमान कोसळले (Photo Credits-Twitter)

पाकव्याप्त काश्मिरमध्ये भारतीय वायुसेनेने (Indian Air Force) केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान (Pakistan)घाबरला आहे. तसेच वायुसेनेकडून 300 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर पाकिस्तानकडून सीमा भागात गोळीबार सुरु करण्यात आला आहे.

श्रीनगर येथून मिग विमानाने टेक ऑफ करताच बडगाम (Budgam) पासून 60 किमी लांब ग्रेंड कलन येथे हे विमान खाली कोसळले आहे. तर अद्याप याबाबत कोणतेही स्पष्टीकरण्यात आले नाही. मात्र तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती देण्यात येत आहे.

तर या दुर्घटनेत पायलट आणि त्याचा सहकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. परंतु या घटनेबाबत लवकरच अधिक तपास करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.