Cleanest Petrol, Diesel in India: भारतात 1 एप्रिलपासून मिळणार जगातील सर्वात स्वच्छ पेट्रोल-डिझेल
File image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

World's Cleanest Petrol, Diesel in India: भारतात येत्या 1 एप्रिलपासून जगातील सर्वात स्वच्छ पेट्रोल (Cleanest Petrol) आणि डिझेल (Cleanest Diesel) मिळणार आहे. भारत यूरो-4 ग्रेड इंधनातून आता यूरो-6 ग्रेड इंधनामध्ये पाऊल टाकत आहे. भारतात आजवर पेट्रोल (Petrol), डिझेल (Diesel), मिळत होते. ते पूरेसे स्वच्छ नव्हते. मात्र, अवघ्या 3 वर्षांमध्ये भारताने मोठी मजल मारत हे स्थान मिळवले आहे. एकूण जागतीक आर्थव्यवस्थेचा विचार करता भारत हा एकमेव देश आहे. ज्याने केवळ तीन वर्षात हा टप्पा गाठला आहे. त्यामुळे भारत आता स्वच्छ तेल पुरवणाऱ्या निवडक देशांच्या यादीत पोहोचला आहे. इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (Indian Oil Corporation) च्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले आहे.

भारतात आता मिळते त्यापेक्षा अधिक स्वच्छ पेट्रोल, डिझेल मिळू लागल्यावर वाहनांच्या माध्यमातून होणारे प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे. इंडियन ऑयल चे अध्यक्ष संजीव सिंह यांनी म्हटले आहे की, 'सुमारे सर्वच वाहन उत्पादक कंपन्यांनी सन 2019 च्या अखेरीपर्यंत BS-6 अन्वये पेट्रोल आणि डिझेल उत्पादन सुरु केले होते. आता पेट्रोलियम कंपन्यांनी देशात पेट्रोल आणि डिजलचा शेवटचा थेंबही BS-6 परिमानामध्ये बदलण्याचा निश्चय केला आहे.'

सिंह यांनी पुढे म्हटले आहे की, 'आम्ही एक एप्रिलपासून BS-6 पेट्रोल-डिझेलची पूर्तता करण्यासाठी काम करत आहोत. सुमारे सर्व रिफायनरीज BS-6 इंधनाचा पूरवठा करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. हे इंधन देशभरातील तेल भंडार डेपोपर्यंत पोहोचवले जाईल.' सिंह यांनी पुढे म्हटले आहे की, 'जगातील सर्वात स्वच्छ पेट्रोल-डिझेल भंडार डेपोंच्या माथ्यमातून पेट्रोल पंपांपर्यंत पोहोचण्यास सुरुवातही झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्येच पेट्रोल-डिझेल विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकेल.' (हेही वाचा, Bharat Petroleum भागिदारी विक्रीसाठी बोली लागण्याची शक्यता, रशिया सरकारची कंपनी Rosneft , सौदीची अरामको, यूएईची ADNOC उत्सुक)

आगोदर दिल्ली आणि दिल्लीच्या आजूबाजूच्या शहरांमध्ये स्वच्छ इंधन पूरवाठा एप्रिल 2019 पर्यंत पोहोचविण्याची आणि त्यानंतर एप्रील 2020 पासून देशभरातील सर्व शहरे आणि ग्रामीण भागांमध्ये स्वच्छ इंधनपूरवठा करण्याची योजना होती. त्यानुसार कंपन्यांनी दिल्ली एनसीआरमध्ये एक एप्रिल 2018 पासूनच नव्या परिमानानुसार अनुकूल इंधन पूरवठा करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर एप्रिल 2019 पासून स्वच्छ इंधनाचा पूरवठा राजस्थानच्या चार आणि उत्तर प्रदेशातील आठ सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये आणि आगरा शहरात सुरु करण्यात आला होता. हरियाणाच्या सात जिल्ह्यांमध्ये हे इंधन 1 ऑक्टोब 2019 पासून उपलब्ध झाले होते. सिंह यांनी सांगितले की, नव्या इंधनापासून बी एस-6 अनुकूल वाहनांचे नाइट्रोजन ऑक्साइड उत्सर्जन पेट्रोल कारमध्ये 25 टक्क्यांपर्यंत आणि डीझेल कारमध्ये 70 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकेल.