International Flights: नागरिकांसाठी खुशखबर! येत्या 15 डिसेंबर पासून सुरु होणार आंतरराष्ट्रीय पॅसेंजर फ्लाइट सर्विस
Flight | Representational Image | (Photo Credits: Twitter)

International Flights: नवं वर्ष आणि ख्रिसमसच्या निमित्त परदेशात फिरण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. कारण सरकारने 14 देश सोडून अन्य देशांसाठी इंटरनॅशनल पॅसेंजर फ्लाइट सर्विस सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार 15 डिसेंबर पासून युके, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँन्ड, फिनलँन्ड, साउथ अफ्रिका, ब्राझील, चीन, मॉरिशस, सिंगापुर, बांग्लादेश, बोतस्वाना आणि झिंम्बावे आणि न्यूझीलंडसह 14 देश सोडून अन्य देशांसाठी रेग्युरल इंटरनॅशनल फ्लाइट्स सुविधा सुरु होणार आहे. असे मानले जात आहे की, सरकारने हा निर्णय कोरोनाच्या नव्या वेरियंटला लक्षात घेत जाहीर केला आहे. तर या 14 देशांमधील काही देशांसोबत एअर बबल अॅग्रिमेंट अंतर्गत फ्लाइट सेवा सुरु आहे.

भारतात कोरोनाने मार्च 2020 मध्ये एन्ट्री केल्यानंतर इंटरनॅशनल फ्लाइट्स ऑपरेशनवर बंदी घालण्यात आली होती. दरम्यान, वंदे भारत फ्लाइट्स आणि बबल अॅग्रिमेंटनुसार फ्लाइट सेवा सुरु केली गेली. ज्या 14 देशांसाठी इंटरनॅशनल फ्लाइट सर्विस ही नियमितपणे सुरु करण्यात आलेली नाही तेथे बबल अॅग्रिमेंटनुसार इंटरनॅशल फ्लाइट सेवा सुरु राहणार आहे, सरकारच्या या निर्णयामुळे विमासेवा उद्योगाला फायदा होणार आहे.(ISRO: 'गगनयान' मोहीम पुढील वर्षी होणार सुरू, केंद्रीय अंतराळ मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची माहिती)

दरम्यान, डिसेंबर पर्यंत लसीकरणाचा वेग वाढवला जाणार आहे. देशातील 40 टक्के नागरिकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. असे मानले जात आहे की, गृह आणि आरोग्य मंत्रालयासोबत चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. इंटरनॅशनल फ्लाइट्सच्या अंतर्गतच देशाअंतर्गत फ्लाइट्स सुद्धा लॉकडाउनच्या दरम्यान बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतु दोन महिन्यांच्या कालावधीनंतर मे 2020 मध्ये मर्यादित क्षमतेसह डोमेस्टिक फ्लाइट्स सेवा नागरिकांसाठी सुरु करण्यात आली होती. परंतु यंदाच्या वर्षात ऑक्टोंबर महिन्यापासून डोमेस्टिक फ्लाइट्स पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी दिली गेली आहे.