भारतीय इक्विटी बेंचमार्क निर्देशांक, बीएसई सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी 50, गुरुवारी लाल रंगात उघडले. मुख्य आर्थिक डेटा लवकरच प्रकाशित होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार (Indian Stock Market) सावध पावले टाकताना दिसतो आहे. बाजार सुरु झाला तेव्हा सकाळी 9:18 वाजता, बीएसई सेन्सेक्स 68 अंकांनी म्हणजेच 0.083% ने घसरून 81,717.61 वर व्यापार करत होता, तर निफ्टी50 17 अंकांनी म्हणजेच 0.070% ने घसरून 25,034.90 वर होता. भारतीय स्टॉक मार्केटने बुधवारी (28 ऑगस्ट) नवा टप्पा गाठला. ज्यामध्ये निफ्टी 25,129 अंकांचा इंट्राडे उच्चांक गाठत 25,052 अंकांवर बंद झाला. दमदार FII प्रवाह आणि सकारात्मक देशांतर्गत आर्थिक निर्देशकांमुळे बाजाराची अलीकडील कामगिरी उत्साहजनक असल्याचे अभ्यास सांगतात.
प्रख्यात बँकिंग आणि मार्केट एक्सपर्ट अजय बग्गा यांनी वृत्तसंस्था ANI सोबत बोलताना सांगितले की, Nvidia च्या व्यवस्थापन मार्गदर्शनामुळे आशियातील काही विभागांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. AI आणि सेमीकंडक्टर स्टॉकवर दबाव आहे, MSCI Asia निर्देशांक 0.5% खाली आहे. Nvidia. यूएस नंतरच्या भारतीय शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये 8% घसरण दिसून आली. भारतात, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) बुधवारी बाजारात निव्वळ रोख रकमेचा प्रवाह नोंदवला. अशा स्थितीत आम्ही एक मजबूत कामगिरीची अपेक्षा करू शकतो जो त्याच्या अलीकडील सर्वकालीन उच्चांकावरून पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. आयटी क्षेत्र Nvidia च्या अपेक्षेपेक्षा कमी मार्गदर्शनामुळे काही नफा बुकिंग होऊ शकते." (हेही वाचा, Orient Technologies Share Price: ओरिएंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड समभाग 40% वधारुन 288 रुपयांवर सूचीबद्ध; पदार्पणातच दमदार कामगिरी)
बाजाराचे अभ्यासक सांगतात की, मासिक डेरिव्हेटिव्ह्जच्या कालबाह्यतेमुळे गुरुवारी अस्थिरता अपेक्षित आहे. त्यामुळे गुंतवणुकदार आवश्यक खबरदारी घेत आहेत. असे असले तरी, विश्लेषक बाजारात सतत हळूहळू वाढ होण्याबद्दल आशावादी आहेत. अभ्यासक जागतिक शेअर बाजाराकडेही लक्ष वेधतात. ते सांतात, एनव्हीडियाच्या त्रैमासिक अहवालापूर्वी बुधवारी यूएस स्टॉकमध्ये घसरण झाली. ज्याचा सध्याच्या एआय-चालित बाजारावर परिणाम पाहायला मिळाला. प्रमुख निर्देशांकांचे व्यवहार कमी झाले. तेलाच्या किमती बहुतांश स्थिर राहिल्या, तर अलीकडच्या मोठ्या नुकसानीनंतर यूएस डॉलर स्थिर झाला.
भारतीय बाजारपेठेत बंधन बँक, ग्रॅन्युल्स, इंडिया सिमेंट आणि हिंदुस्थान कॉपर आज F&O नकारात्मक स्थितीत आहेत. गुंतवणुकीच्या आघाडीवर, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs) निव्वळ विक्रेते बनले. त्यांनी बुधवारी 1,347 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफलोड केले, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) 439 कोटी रुपयांचे समभाग विकले. उल्लेखनीय म्हणजे, FII ची निव्वळ लाँग पोझिशन्स मंगळवारी रु. 86,286 कोटींवरून रु. 1.34 लाख कोटींपर्यंत वाढली, जे बाजारातील अस्थिरता असूनही सावधपणे आशावादी दृष्टीकोन दर्शवते.