हाफिज सईद याच्या घराबाहेर हल्ला केल्याच्या आरोपावर भारताचा पाकिस्तानवर पलटवार, स्वत:चे घर ठिक करण्याचा दिला सल्ला
Jamat-ud-Dawa chief (JuD) Hafiz Saeed (Photo Credits-ANI)

दहशतवादी हाफिज सईद (Hafiz Saeed) याच्या घराबाहेर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. यावरुन पाकिस्तानने भारतावर आरोप लावत त्यांनी असे म्हटले की, या हल्ल्यामागे भारतीय रॉ चा हात आहे. याच आरोपांवरुन आता भारताने पलटवार केला आहे. भारताने पाकिस्तानने लावलेल्या आरोपांवरुन पलटवार केला आहे. आज परराष्ट्र मंत्रालयाने म्हटवे की, भारताच्या विरोधात वाईट प्रचार करणे हे पाकिस्तानसाठी कोणतीही नवी गोष्ट नाही आहे. ऐवढेच नव्हे तर पाकिस्ताने स्वत:चे घर ठिक करण्यावर लक्ष केंद्रित करावे आणि दहशतवादाच्या विरोधात कठोर कारवाई करावी.

परराष्ट्र मंत्रालयाने असे ही म्हटले की, जागतिक स्तरावर सुद्धा सर्वांना पाकिस्तानच्या कुरापतींबद्दल चांगलेच ठाऊक आहे. तर पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी असे म्हटले की, 23 जुलै रोजी लाहौर मधील जोहार टाउनमध्ये असलेल्या हाफिज सईदच्या घराबाहेर झालेला हल्ला हा भारताच्या रॉ एजेंटकडून करण्यात आला. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला होता. अन्य 14 जण गंभीर जखमी झाले होते. सईद याने 2008 मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला करण्यासह दहशतवादी संघटना जमात-उद-दावाचा प्रमुख आहे.(हाफिज सईदच्या घरावर झालेल्या हल्ल्यामागे रॉ एजेंटचा हात, पाकिस्तानने लावला आरोप)

यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी म्हटले होते की, या भयंकर दहशतवादी हल्ल्याची योजना आणि फायनान्सिंगची लिंक भारतासोबत आहे. त्यांनी जागतिक समुदायाला या व्यवहाराच्या विरोधात इंटरनॅशनल इंस्टिट्युशन्सला एकत्रित करण्याचे अपील केले आहे.