Union Health Minister Dr Harsh Vardhan | (Photo Credits: ANI)

देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत असून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नसल्याने त्याबाबत संशोधन करण्यात येत आहेत. याच दरम्यान आता आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी देशात कोविडच्या रुग्णांचा रिकव्हरी रेट 65 टक्के तर मृत्यूदर 2.72 टक्क्यांवर पोहचल्याची माहिती दिली आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कितीने वाढत आहे याकडे अधिक लक्ष दिले जात नाही आहे. मात्र त्या संदर्भातील चाचणी आणि उपचार करणे महत्वाचे असल्याचे ही हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे.

जवळजवळ 2.7 लाख कोरोनाच्या चाचण्या दिवसाला होतात असे हर्ष वर्धन यांनी पुढे म्हटले आहे. देशातील लोकसंख्या ऐवढी आहे की कोविडचा प्रसार कम्युनिटी ट्रान्समिशनच्या माध्यमातून अद्याप झालेला नाही. परंतु स्थानिक पातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो असे ही हर्ष वर्धन यांनी स्पष्ट केले आहे.(Coronavirus in India: मागील 24 तासांत COVID-19 च्या 26,506 नव्या रुग्णांची सर्वात मोठी भर; देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 7,93,802 वर)

दरम्यान, भारतात मागील 24 तासांत 26,506 नव्या रुग्णांची सर्वात मोठी भर पडली आहे. तर 475 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 7,93,802 वर पोहचला आहे. त्यातील 4,95,513 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 2,76,685 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. म्हणजेच या रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान देशात एकूण 21,604 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे बळी गेला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.