देशातील कोरोना बाधितांचा आकडा 23 लाखांच्या पार गेला आहे. मागील 24 तासांत 66 हजार हून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने पडणारी मोठी भर नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि भीतीचे वातावरण निर्माण करते. दरम्यान आरोग्य मंत्रालयाकडून (Ministry of Health & Family Welfare) एक महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. आज देशात तब्बल 56,383 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना संसर्गातून प्रकृती सुधारलेल्यांची संख्या सुमारे 17 लाख झाली आहे. तर मृत्यूदर (Fatality Rate) 1.96% इतका आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाशी सामना करणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी ही माहिती नक्कीच दिलासादायक आहे.
देशातील महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात, आसाम, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि दिल्ली या 10 राज्यांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अधिक आहे. एकूण 80% हून अधिक नवीन रुग्ण या राज्यांमध्ये आढळून येत आहेत. दरम्यान देशातील कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे रिकव्हरी रेटही सुधारत आहे.
ANI Tweet:
India posts highest-ever single day recoveries of 56,383 in a single day. With this number, the total recovered #COVID19 patients have touched nearly 17 lakhs (16,95,982) today. The case fatality rate has further improved to 1.96%: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/iUXlZumtG4
— ANI (@ANI) August 13, 2020
आज देशात 66 हजार 999 नव्या रुग्णांची भर पडली असून 942 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 23 लाख 96 हजार 638 वर पोहचला आहे. त्यापैकी 6 लाख 53 हजार 622 अॅक्टीव्ह रुग्ण असून 16 लाख 95 हजार 982 रुग्ण कोरोना संसर्गातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना संसर्गामुळे बळी गेलेल्यांचा आकडा 47 हजार 033 वर पोहचला आहे.