World Yoga Day 2021 चं औचित्य साधत भारतीय टपाल विभागाद्वारे 800 ठिकाणी विशेष कॅन्सलेशन टपाल तिकीट होणार जारी
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे (International Yoga Day 2021) औचित्य साधत टपाल विभाग विशेष टपाल तिकीट जारी करणार आहे. हा अनोखा उपक्रम 7 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन 2021 निमित्त हाती घेण्यात आला आहे. संपूर्ण भारतातील 810 मुख्य टपाल कार्यालयांद्बारे सचित्र रचना असलेले विशेष कॅन्सलेशन तिकीट जारी केले जाणार आहे. मोठ्या प्रमाणात एकाचवेळी जारी करण्यात येणाऱ्या संग्रहित टपाल तिकीटांपैकी हे एक ठरणार आहे.

वितरण आणि वितरण व्यवस्था नसलेली सर्व मुख्य टपाल कार्यालये 21 जून 2021 रोजी कार्यालयात नोंदणी केलेल्या सर्व टपालाच्या माध्यमातून हे विशेष तिकीट जारी करतील. 21 जून रोजी पणजी आणि मडगाव मुख्य टपाल कार्यालयात हे टपाल तिकीट उपलब्ध असेल. आंतरराष्ट्रीय योग दिन 2021 चे हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये लिहिलेल्या ग्राफिकल रचनेसह सचित्र रचनेचा छाप असणारे हे विशेष टपाल तिकीट असेल. कॅन्सलेशनला टपाल चिन्हांकित म्हणून परिभाषित केले आहे. तिकीटाचा पुनर्वापर रोखण्यासाठी ते रद्द करण्यासाठी वापरले जात असे. अशी रद्द टपाल तिकीटे संग्रहणीय आणि बहुतेक टपाल तिकीट संग्रहाच्या अभ्यासाचे विषय असतात.

गेल्या काही वर्षांमध्ये, टपाल तिकीट संकलनाची आवड कमी झाली आहे आणि या छंद किंवा कलेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी भारतीय टपाल विभागाने टपाल तिकीट संग्रहाची एक योजना राबवली आहे. टपाल तिकीट संग्रहाच्या केंद्रांमध्ये आणि नियुक्त केलेल्या टपाल कार्यालयांमधील काउंटरवरुन संकलकांना टपाल तिकीटे खरेदी करता येतात, एखादी व्यक्ती 200 रुपये जमा करून सहजपणे देशातील कोणत्याही मुख्य टपाल कार्यालयांमधील टपाल तिकीट संग्रह खाते उघडू शकते आणि शिक्के व विशेष लिफाफ्यांसारख्या वस्तू मिळवू शकते. याव्यतिरिक्त, टपाल तिकीट संग्रह ठेव योजनेअंतर्गत स्मारक तिकिटे फक्त टपाल तिकीट केंद्रांमध्ये आणि काउंटरवर उपलब्ध आहेत. ही तिकीटे मर्यादित प्रमाणात छापली जातात.

योग आणि आंतराष्ट्रीय योग दिवस हे गेल्या काही वर्षांपासून संग्रहित टपाल तिकिटांसाठी लोकप्रिय विषय ठरले आहेत. 2015 मध्ये, टपाल विभागाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दोन तिकिटांचा संच आणि एक लघु पत्रक जारी केले होते. 2016 मध्ये दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूर्यनमस्कारावरील टपाल तिकिट जारी केले. 2017, मध्ये, यूएन टपाल प्रशासनाने (यूएनपीए) न्यूयॉर्कमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचे स्मरण करण्यासाठी 10 योगासने दर्शविणार्‍या टपाल तिकिटांचा संच जारी केला.

गेल्या सहा वर्षात जगभरात विविध प्रकारे ( अनेकदा सर्जनशील) आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. भारतात यापूर्वीच्या योग दिनाच्या अनोख्या सोहळ्याची अनेक सुंदर चित्रे चित्रित करण्यात आली आहेत. यामध्ये हिमालयाच्या बर्फात योगाभ्यास करणारे भारतीय सैनिक, सेवेतून निवृत्त झालेल्या आयएनएस विराट वर योग करणारे नौदल अधिकारी आणि कॅडेट्स, आंतरराष्ट्रीय योग्य दिनाचा संदेश देणाऱ्या वाळू शिल्पाची निर्मिती, भारतीय नौदलाची पाणबुडी आयएनएस 'सिंधुरत्न'वर योगासने करणारे भारतीय नौदलाचे अधिकारी यांचा यात समावेश आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यातली विविधता यात सध्याचा टपाल तिकीट संग्रह उपक्रम भर घालत आहे.

संयुक्त राष्ट्र महासभेने (यूएनजीए) 11 डिसेंबर 2014 रोजी स्वीकारलेल्या ठरावात 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जाहीर केला. 2015 पासून, हा दिवस जगभरात सह्भागींच्या निरंतर वाढणार्‍या संख्येने साजरा केला जातो.

यावर्षी कोविड -19 महामारीच्या परिस्थितीचा विचार करता “योगा बरोबर राहा, घरी राहा.” या संकल्पनेतून योग दिनाचे बहुतेक कार्यक्रम आभासी माध्यमातून होणार आहेत.

देश सावधगिरी बाळगत लॉकडाउनमधून बाहेर पडत असल्याने 800 हून अधिक संग्रहांसह (प्रत्येक पोस्ट ऑफिसचे संग्रहण करण्यायोग्य रचना रद्द करणे) हा भव्य टपाल स्मरणोत्सव टपाल तिकीट संग्रहाच्या अपार संधी खुल्या करेल आणि कदाचित देशातील टपाल तिकीट संग्रह उपक्रम पुन्हा प्रज्वलित करेल.