India-Pakistan Tension: पाकिस्तान विमानांनी सीमा उल्लंघन केल्यानंतर पंजाब मधील विमानतळ बंद
संग्रहीत आणि प्रतिकात्मक प्रतिमा

India-Pakistan Tension:  पुलवामा (Pulwama) दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने (Indian Air Force)पाकव्याप्त काश्मिरवर मोठी कारवाई केली. त्यानंतर आज पाकिस्तानच्या (Pakistan) विमानांनी सीमा उल्लंघन करत आपली दोन विमाने भारतात घुसवली. या घटनेनंतर आता जम्मू-काश्मिर विमानतळावर हाय अलर्ट (High Alert) जाहीर करण्यात आले आहे. त्याचसोबत विमानतळांवरील विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सध्या ताज्या बातमीनुसार राज्यातील आठ विमानतळे  बंद करण्यात आली असल्याची माहिती दिली जात आहे.

राज्यातील लेह, जम्मू, श्रीनगर आणि पाठनकोट, चंदीगढ व अमृतसर विमानतळावर हाय अलर्ट ही जाहीर करण्यात आला आहे. त्याचसोबत व्यायसायिक विमानांची उड्डाणे ही रद्द करण्यात आली आहेत. भारतीय एअरपोर्ट प्राधिकरण संबंधित सूत्रांनी जम्मू-काश्मिर व्यतिरिक्त पंजाब मधील विमानतळे बंद करण्यात आली आहेत.

स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार पुढील 3 तास तरीही विमानतळे बंद राहणार असल्याचे सांगितले जात आहे. तर पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी सीमा उल्लंघन करत एलओसी जवळील 4 ठिकाणी बॉम्ब हल्ला केला. त्यामुळे आता सर्वत्र हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

महत्त्वाची टीप: भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित केलेले वृत्त लेटेस्टलीकडे प्राप्त माहितीवर आधारीत आहे. कोणत्याही निष्कर्षावर पोहचण्यापूर्वी किंवा सोशल मीडियावर संदेश प्रसारित करण्यापूर्वी वाचकांनी भारतीय लष्कराकडून मिळणाऱ्या अधिकृत माहिती मिळेपर्यंत प्रतिक्षा करावी अशी विनंती.