Indian High Commission in Pakistan (Photo Credits: Twitter)

संपूर्ण भारतात आज स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे सकाळी लाल किल्ल्यावर झालेले भाषण आणि ध्वजारोहण सोहळा म्हणजे सर्व भारतीयांसाठी सोनेरी क्षणच होता. सध्या भारत-पाक मधील संबंधात जरी चढउतार पाहायला मिळत असले तरीही आज पाकिस्तानात देखील भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा केला गेला. पाकिस्तानातील भारतीय उच्च आयोगामध्ये भारतीयांनी स्वातंत्र्य दिन साजरा केला व एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) शुभेच्छा दिल्या.

भारताच्या 73व्या स्वातंत्र्यदिना निमित्त भारतीय दूतावासांनी पाकिस्तानातील भारतीय उच्च आयोगात ध्वजारोहन केले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव अहुवालिया (Gaurav Ahluwalia) यांनी करुन त्यांनी सर्वांसमोर राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी पाठवलेला संदेश वाचून दाखवला. पाहा फोटोज

हेही वाचा-  भारतीय लष्करात होणार 'चीफ ऑफ डिफेन्स' पदाची निर्मिती; स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील IMP मुद्दे

यावेळी सर्वांचा आनंद आणि उत्साह हा वाखाण्याजोगा होता. त्यासोबत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राजधानी दिल्ली येथील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरुन (Red Fort) देशवासियांना संबोधित केले. आजच्या भाषणात पंतप्रधानांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. पंतप्रधान मोदी यांचे हे भाषण साधारण 45 मिनिटे चालले. ज्यात त्यांनी कलम 370, तिहेरी तलाक विधेयक, चांद्रयान, अर्थव्यवस्था, लष्कर, पर्यावरण, स्वच्छ भारत यांसह विविध मुद्द्यांवर भाष्य केले.