भारतामध्ये आता COVID-19 चं निदान वेगवान करण्यासाठी टेस्ट वाढवण्यसाठी चीनकडून मदत घेतली जाणार आहे. दरम्यान चीनकडून 6.5 लाख कीट्स घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. चीन मधील भारताचे राजदूत Vikram Misri यांनी Rapid Antibody Tests,RNA Extraction Kits सह साडे सहा लाखाहून अधिक कीट्स पाठवली जाणार असल्याची माहिती दिली आहे. आज (16 एप्रिल) चीनच्या Guangzhou Airport वरून भारतासाठी ही मेडिकल कीट्स दिली जाणार आहेत. भारतामध्ये सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 12,380 आहे त्यापैकी 10,477 जणांवर उपचार सुरू असून 414 जणांचा बळी गेला आहे.
विकास मिसरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताला 15 मिलियन पीपीई गिअर्सदेखील टेस्टिंग कीट्ससोबत पाठवण्यात आले आहेत. दरम्यान भारताला पुढील काही आठवड्यात 2-3 मिलियन कीट्स चीनमधून मिळणार आहेत.
ANI Tweet
Rapid Antibody Testing Kits (first lot of 3 lakh from Guangzhou Wondfo and 2.5 lakh from Zhuhai Livzon) and RNA Extraction Kits (1 lakh from MGI Shenzhen), all custom cleared yesterday late night have left this morning for India: Government Sources #Coronavirus
— ANI (@ANI) April 16, 2020
दोन महिन्यांहून अधिक काळ कोरोना विरूद्धची लढाई लढल्यानंतर आता चीनमधील फॅक्टरीज पुन्हा सुरू झाल्या आहेत. सध्या भारतासोबत जगातील अनेक देशांना चीनकडून PPE,व्हेंटीलेटर्स पाठवले जात आहेत. सध्या भारताला वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत वस्तूंच्या पुरवठ्याची गरज आहे. यामध्ये पीपीई किट, ग्लोव्ह्ज, व्हेंटिलेटर्स, मास्क यांची गरज आहे. या वस्तूंची चीनमध्ये मोठ्या प्रमाणात निर्मिती होते. त्यामुळे आता 15 लाख मेडिकल कीट्ससाठी भारत चीनवर अवलंबून आहे.