ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (British Broadcasting Corporation) अर्थात बीबीसीच्या (BBC) दिल्ली येथील कार्यालयावर भारतीय आयकर विभागाने छापेमारी (Income Tax Raids On BBC Office) केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, आयकर विभागाने (Income Tax) मात्र ही कारवाई म्हणजे छापेमारी नसून प्राप्त तक्रारींवरुन केलेला एक पाहणी असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या पाहणीवेळी आयकर अधिकाऱ्यांनी कार्यालयातील लॅपटॉप आणि मोबाईल फोनही जप्त केल्याचे समजते. इंडिया: द मोदी क्वेश्चन (India: The Modi Question) हा एक माहितीपट (डॉक्युमेंट्री) बीबीसीने काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केली होती. या डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून गुजरात दंगलीवर भाष्य करण्यात आले होते. ही दंगल झाली तेव्हा विद्यमान पंतप्रधान नेरंद्र मदी हे गुजरात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री होते. त्यामुळे आयकर विभागाच्या या कारवाईबद्दल अनेक तर्क वितर्क लढविण्यात येत आहेत.
आयकर विभागाने बीबीसीवर केलेल्या कारवाईवरुन देशभरात राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. आयकर विभागाने केलेल्या कारवाईचे वृत्त येताच काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी तत्काळ प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेमध्ये जयराम रमेश यांनी बीबीसीने काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केलेल्या इंडिया: द मोदी क्वेश्चन (India: The Modi Question) या डॉक्युमेंट्रीचा संबंध जोडला आहे. या डॉक्युमेंटीमुळेच बीबीसीच्या कार्यालयांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येत असल्याचे जयराम रमेश यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Revised Income Tax Slabs: Income Tax Exemption Limit ते 87A अंतर्गत New Tax Regime मध्ये पहा काय झाले बदल)
ट्विट
Income Tax department is conducting survey at the BBC office in Delhi: Sources pic.twitter.com/vqBNUUiHTD
— ANI (@ANI) February 14, 2023
इंडिया: द मोदी क्वेश्चन अर्थात भारत- मोदी यांना प्रश्न या डॉक्युमेंट्रीमध्ये गुजरातध्ये 2002 मध्ये झालेल्या जातीय दंगलीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात झालेल्या या दंगलीचे संशोधनात्मक परीक्षण ही डॉक्युमेंट्री करते. ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. तथापी भारतात ही डॉक्युमेंट्री प्रसारीत करण्यास तिचे जाहीर प्रदर्शन करण्यात केंद्र सरकार आणि सत्ताधारी भाजप यांच्याकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे. या डॉक्युमेंट्रीवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली आहे. तसेच, तिचे स्वागतही करण्यात आले आहे. त्यामुळे समाजात याबाबत संमिश्र भावना आहेत.