75 वर्ष किंवा अधिक वय असलेल्यांना Income Tax Return भरावा लागणार नाही, सरकारचा जेष्ठ नागरिकांना दिलासा
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

75 वय आणि त्याहून अधिक वय असलेल्या वरिष्ठ नागरिकांना आर्थिक वर्ष 2021-22 साठी आयकर रिटर्न (ITR) भरावा लागणार नाही आहे. आयकर विभागाने आयटीआर दाखल करण्यामध्ये सूट मिळवण्यासाठी एका फॉर्मची घोषणा केली आहे. हा फॉर्म वरिष्ठ नागरिकांना बँकेत जमा करावा लागणार आहे. आर्थिक वर्ष 2021-22 साठी बजेटमध्ये पेन्शन इनकम आणि त्याच बँकेत असेलल्या FD वर व्याज मिळवणाऱ्या 75 वर्ष किंवा अधिक वयाच्या नागरिकांना आयटीआर भरण्याच्या प्रावधानातून सूट देण्यात आली आहे.

या वरिष्ठ नागरिकांना एप्रिल पासून सुरु होणाऱ्या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न दाखल करण्याची गरज नसणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) यांच्याकडूनच वरिष्ठ नागरिकांसाठी नियम आणि फॉर्मची घोषणा करण्यात आली आहे. वरिष्ठ नागरिकांना हा फॉर्म बँकेत जमा करावा लागणार आहे.(PM Narendra Modi बनले जगातील पहिल्या क्रमांकाचे नेते, तर मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष Andrés Manuel López Obrador दुसऱ्या स्थानी) 

आयकर दाखल करण्याची अशांना मिळणार आहे जे व्याजवरील रक्कम ही त्याच बँकेत मिळते जेथे पेन्शन मिळते. आयकर कायद्याअंतर्गत एक निर्धारित सीमेपेक्षा अधिक इनकम असलेल्या नागरिकाना आयटी रिटर्न भरावा लागतो. वरिष्ठ नागरिक आणि अत्यंत वरिष्ठ नागरिक (80 वय आणि अधिक) यांच्यासाठी ही सीमा काही अधिक आहे.

टॅक्स रिटर्न न भरल्यास दंड लागतोच पण संबंधित व्यक्तीला TDS ही द्यावा लागतो. नांगिया अॅन्ड कंपनी एलएलपीचे निर्देशक इतेश दोशी यांनी म्हटले की, अनुपालनाचे ओझे कमी करण्यासाठी 75 वय किंवा त्याहून अधिक वरिष्ठ नागरिकांना बजेट मध्ये दिलासा दिला गेला आहे.(PM Modi Birthday: पीएम नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त BJP कडून सेवा आणि समर्पण अभियान चालवले जाणार)

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2021-22 च्या आपल्या बजेटमध्ये म्हटले होते की, आजादीच्या 75 व्या दिनानिमित्त सरकार 75 वय आणि त्याहून अधिक वय असलेल्या वरिष्ठ नागरिकांवरील अनुपालनाचा बोझा कमी करणार आहे. पुढे त्यांनी असे म्हटले की, वरिष्ठ नागरिक ज्यांच्याकडे फक्त पेंशन आणि व्याजाची रक्कम आहे. त्यांना मी आयटी रिटर्न भरण्यापासून सूट देण्याचा प्रस्ताव ठेवते. भरणा करणारी बँक त्यांच्या उत्पन्नावर आवश्यक कर कापेल.