PM Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवानिमित्त भाजप कडून सेवा आणि समर्पण अभियान राबवणार आहे. नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोंबर पर्यंत हे अभियान सुरु ठेवण्यात येणार आहे. तर 7 ऑक्टोंबरला नरेंद्र मोदी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानच्या आधारावर आपली 20 वर्ष पूर्ण करणार आहेत. 7 ऑक्टोंबर 2001 रोजी नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांच गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत नरेंद्र मोदी हे सातत्याने घटनात्मक पदावर कायम आहेत.
सेवा आणि समर्पण अभियानाच्या माध्यमातून भाजप लोकांना सेवेच्या महत्वामुळेच राष्ट्र आणि समाजासह समर्पणाची भावना जागृत होईल. याच संबंधित भाजप संपूर्ण देशात कार्यक्रम राबवणार आहे. सर्व प्रदेश आण जिल्हा मुख्यालयात पीएम मोदी यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या जनकल्याणांच्या कामांबद्दलचे प्रदर्शन भरवले जाणार आहे. या व्यतिरिक्त नमो अॅपवर ही वर्च्युअल पद्धतीने प्रदर्शन असणार आहे. त्याचसोबत पीएम गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गरीबांना मोफत राशन दिले जाणार आहे. याचे वितरण पक्षातील पदाधिकारी आणि जनप्रतिनिधी करणार आहेत. त्याचसोबत पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून रक्तदान शिबीर आणि स्वच्छता अभियान चालवले जाणार आहे.
तर पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि जनप्रतिनिधी लसीकरण केंद्राला भेट देणार आहेत. प्रत्येक विभागात दिव्यांगांना कृत्रिय अवयव आणि उपकरण सुद्धा दिले जाणार आहेत, तर जिल्हा स्तरावर आरोग्य चाचणी शिबीर सुद्धा चालवले जाणार आहे. देशातील सर्व बुथवरुन नरेंद्र मोदी यांच्याकडून 5 कोटी शुभेच्छापत्र पाठवले जाणार आहेत.(AYUSH AAPKE DWAR: डॉ. मुंजापारा महेंद्रभाई यांच्या द्वारा आयुष भवनातून 'आयुष आपके द्वार' मोहिमेचा शुभारंभ)
याव्यतिरिक्त 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त खादीच्या वापराला प्रोत्साहन देण्याचा कार्यक्रमही राबवला जाईल. तसेच नदी स्वच्छता मोहिमेअंतर्गत एक विशेष कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. त्यानुसार 71 नद्या स्वच्छ केल्या जातील. त्याचबरोबर उत्तर प्रदेशात 71 ठिकाणी गंगा स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबवली जाईल. तर पक्षााकडून अनाथ मुलांसाठी एक विशेष मोहीम देखील चालवली जाणार आहे.