कर न भरल्यास आयकर विभागाकडून नोटीस येणं काही नवीन नाही. पण या वेळी आयकर विभागाने चक्क नोटीस पाठवली आहे हनुमानाला. होय, हे खरं आहे की हनुमानाला, आयकर विभागाने नोटीस पाठवत 2 कोटी 23 लाख 88 हजार 730 रुपये इतका कर भरायला सांगितला आहे. मध्यप्रदेशच्या इंदौर मध्ये रणजीत हनुमान मंदिर खूप प्रसिद्ध आहे. या मंदिरालाच आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. आणि मंदिराकडे या नोटीसला उत्तर देण्याची वेळ फक्त 13 डिसेंबरपर्यंत आहे.
पंतप्रधान मोदींनी जेव्हा नोटबंदी जाहीर केली होती, तेव्हा या मंदिराच्या दानपेटीमध्ये 26 लाखांपेक्षा जास्त रक्कम सापडली. ही रक्कम काळ्या पैशापासून वाचण्यासाठी तर नाही ना कोणी दान केली म्हणून आयकर विभागाने मंदिरातील दानपेटीवर बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. परंतु, एक वर्षानंतर, या मंदिराच्या दान पेटीतील रक्कम सव्वा दोन कोटींहून अधिकवर पोहोचली.
पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरामध्ये 1 जानेवारीपासून मोबाईल बंदी; मंंदिर प्रशासनाचा निर्णय
आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार रणजीत हनुमान मंदिराची ट्रस्ट आयकर ऍक्टमध्ये रजिस्टर केलं नसल्याची बाब समोर आली. त्यामुळेच, आयकर विभागाने मंदिराचं संपूर्ण उत्पन्नाची माहिती काढून त्यावर 77 टक्के कर लावला आहे.
यासर्वावर, मंदिर प्रशासने खुलासा दिला की, त्यांनी आयकर विभागाने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं सीएच्या माध्यमातून वेळोवेळी दिली आहेत.