
पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाई मंदीरामध्ये (Vitthal-Rukmini Mandir) आता भाविकांना मोबाईल फोन घेऊन जाण्यास पुन्हा प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान ही बंदी 1 जानेवारीपासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटणार असल्याची चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव मंदिरात मोबाईल घेऊन जाण्यास मज्जाव करण्याच्या तयारीत प्रशासन आहे. पंढरपूर: विठ्ठल-रखुमाईला उबदार कपड्यांचा साज; सोशल मीडीयावर व्हायरल झाले विलोभनीय रूप.
दरम्यान सुरक्षेचे कारण पुढे करत मोबाईल लॉकर्स उघडून भाबड्या विठूमाऊलीच्या भविकांकडून पैसे उकळले जातात. भाविकांची फसवणूक केली जात असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर भाविकांच्या मागणीवरून काही दिवसांपूर्वी मोबाईल बंदी रद्द करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा मोबाईलवर बंदी घालण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी समोर अनेक भाविक फोटो काढतात हे कारण देत प्रशासनाने मोबाईलवर बंदी घातली. परंतू अशाप्रकारचे फोटो काढण्याचे प्रकार उद्योगपती आणि राजकीय मंडळींकडून प्रामुख्याने होतात. असा सामान्य भाविकांनी दरम्यान मंदिर समितीच्या निर्णयाचा फटका सर्वसामान्य भाविकांना बसणार असल्याचा आरोप होत आहे.