
भारतीय हवामान विभागाने (IMD) 15 मे रोजी महाराष्ट्र (Maharashtra Weather Forecast), आंध्र प्रदेश (Andhra Pradesh Rain), छत्तीसगड, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुसळधार पावसामुळेउद्भवणारी संभाव्य स्थिती विचारात घेता आयएमडीने सदर राज्यांना ऑरेंज अलर्ट (IMD Orange Alert) जारी केला आहे. या इशाऱ्याचा अर्थ असा की, हवामानामुळे दैनंदिन जीवनात व्यत्यय येऊ शकतो आणि रहिवाशांनी आपत्कालीन उपाययोजनांसाठी तयार राहावे. भारतातील बहुतेक इतर भागांमध्ये पिवळ्या रंगाचा इशारा देण्यात आला आहे, जो कमी तीव्र हवामान परिस्थितीची शक्यता दर्शवितो. दरम्यान, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश (Uttar Pradesh Heatwave) आणि पूर्व राजस्थान या हवामान अंदाज आणि निरीक्षणाबाहेर आहेत.
दक्षिण भारतातील हवामान अंदाज
आयएमडी जारी केलेला हवामान अंदाज सांगतो की, पुढील काही दिवसांत दक्षिण भारतातील खालील प्रदेशांमध्ये लक्षणीय पाऊस पडण्याची शक्यता आहे:
- तामिळनाडू आणि पुडुचेरी: 16 मे पर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- उत्तर कर्नाटक: 18 मे पर्यंत ओले हवामान अपेक्षित आहे.
- दक्षिण कर्नाटक: 15 आणि 18 मे रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- किनारी आंध्र प्रदेश: 15 मे रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर रायलसीमा प्रदेशात 16 आणि 18 मे रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- केरळ: 18 ते 20 मे दरम्यान पावसाचा अंदाज. (हेही वाचा, Mumbai Weather Update: मुंबई, ठाणे, पालघरसह अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी; पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम स्परुपाचा पाऊस पडण्याची शक्यता)
वायव्य भारतासाठी हवामान अंदाज
आयएमडीच्या 14 मे च्या अहवालानुसार, वादळ, वीज आणि वादळी वारे (50 किमी प्रतितास वेगाने) यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे:
- जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद
- हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड
- पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश
- 18 आणि 20 मे दरम्यान ही हवामान नियमितता विकसित होण्याची अपेक्षा आहे. (हेही वाचा: Maharashtra Weather Updates: पुढील पाच दिवस मध्यम ते तीव्र मेघगर्जनेसह जोरदार वारे, पावसाचा अंदाज; पहा आयएमडीचा हवामान अंदाज)
ईशान्य भारतातील हवामान अंदाज
- ईशान्य भागातही लक्षणीय पाऊस पडण्याची शक्यता आहे:
- अरुणाचल प्रदेश: 18 मे पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा: 15 मे रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- आसाम आणि मेघालय: 15 आणि 16 मे रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पश्चिम भारतातील हवामान अंदाज
- गोवा आणि महाराष्ट्र: 18 मे पर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- गुजरात: 15 मे रोजी वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पूर्व आणि मध्य भारतातील हवामान अंदाज
पुढील पाच दिवसांत खालील प्रदेशांमध्ये विखुरलेला पाऊस, गडगडाटी वादळे आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे:
- मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ
- झारखंड, ओडिशा, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम
- अंदमान आणि निकोबार बेटे (15 मे रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे)
उष्णतेच्या लाटेचा इशारा
देशाच्या अनेक भागात पावसाचा अंदाज असूनही, उष्णतेच्या लाटेची परिस्थिती कायम राहण्याची अपेक्षा आहे.
- पश्चिम उत्तर प्रदेश- 18 मे पर्यंत
- पूर्व उत्तर प्रदेश आणि पश्चिम राजस्थान- 17 मे पर्यंत
आयएमडीने या प्रदेशातील लोकांना उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे, ज्यामध्ये हायड्रेटेड राहणे आणि दुपारच्या गर्दीच्या वेळी बाहेरील कृती जसे की, उन्हात जाणे, गडगडाटी वादळात उघड्यावर, झाडाखाली थांबणे वैगैरे गोष्टी, टाळणे समाविष्ट आहे.