Death/ Murder Representative Image Pixabay

दिल्ली आयआयटी (Delhi IIT) मध्ये शिकत असलेला 23 वर्षीय महाराष्ट्रातील एक तरूण हॉस्टेल रूम मध्ये मृतावस्थेमध्ये आढळला आहे. हॉस्टेल मध्ये तो खोलीत लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळला. ही आज 16 फेब्रुवारीची आयआयटी कॅम्पस मधील द्रोणगिरी हॉस्टेल (Dronagiri Hostel, IIT Campus) मधील घटना आहे. तर हा मृत मुलगा महाराष्ट्रातील नाशिक (Nashik) चा आहे. अशी माहिती देण्यात आली आहे. दिल्ली पोलिस सध्या या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार हा मुलगा एम टेक (M Tech) च्या अंतिम वर्षाला शिकत होता.

घटनास्थळी दिल्ली पोलिसांची क्राईम टीम पोहचली आहे. पुढील तपास सध्या सुरू करण्यात आला आहे. हा आत्महत्येचा प्रकार असावा असा प्राथमिक अंदाज आहे. Sanjay Nerker असं या मृत मुलाचं नाव आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नेरकरच्या पालकांनी त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही घटना  समोर आली. फोन करून त्याच्याशी संपर्क साधता आला नाही, म्हणून त्याच्या पालकांनी  त्याच्या वसतिगृहातील सोबती असलेल्या मुलांना त्याची तपासणी करण्यास सांगितले. मात्र तो मृतावस्थेमध्ये आढळला.

पहा ट्वीट

आजकाल मानसिक ताण तणाव ही मोठी गुंतागुंतीची आणि कठीण समस्या बनत चालली आहे. अशात स्पर्धात्मक बनत चाललेल्या युगामध्ये विद्यार्थ्यांना देखील अनेक दडपणं आहेत. काही दिवसांपूर्वी जेईई मेन्स परीक्षेमध्ये अपेक्षित गुण न मिळाल्याने एका मुलाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. 19 डिसेंबर 2023 ते 18 जानेवारी 2024 या कालावधीत IIT-कानपूरच्या कॅम्पसमध्ये संशयित विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या तीन घटना घडल्या आहेत.