PM Narendra Modi (फोटो सौजन्य - ANI)

PM Modi Warns Pakistan: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज गुजरातमधील भूज जिल्ह्यातील एका कार्यक्रमात पोहोचले. येथे पोहोचताच पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत करण्यात आले. येथून त्यांनी अनेक क्षेत्रांसाठी 53400 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली आणि उद्घाटनही केले. यावेळी त्यांनी एका जाहीर सभेलाही संबोधित केले. येथून त्यांनी पुन्हा एकदा शत्रू देश पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे.

ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल. मी सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. भारतीयांविरुद्ध डोळे दाखवणाऱ्यांना सोडले जाणार नाही. शांततेत भाकरी खा, नाहीतर भारतीय सैन्याकडून गोळ्या खा. पाकिस्तानच्या जनतेने त्यांच्या देशाला दहशतवादापासून मुक्त करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, असंही यावेळी पंतप्रधानांनी म्हटलं आहे.' (हेही वाचा -PM Modi On Operation Sindoor: पाकिस्तान आणि दहशतवादी अड्ड्यांविरुद्धची कारवाई फक्त पुढे ढकलण्यात आलीय; दाहोदमध्ये पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा)

ऑपरेशन सिंदूरने आमचे धोरण पूर्णपणे स्पष्ट केले -

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'दहशतवादाविरुद्ध आमचे धोरण शून्य सहनशीलतेचे आहे. ऑपरेशन सिंदूरने आमचे धोरण पूर्णपणे स्पष्ट केले आहे. जो कोणी आमचे रक्त सांडेल त्यालाही असेच उत्तर मिळेल. त्यांना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही. ऑपरेशन सिंदूर हे मानवतेला वाचवण्याचे आणि दहशतवाद संपवण्याचे ध्येय आहे. पाकिस्तान दहशतवादाविरुद्ध काही कारवाई करेल का हे पाहण्यासाठी आम्ही 15 दिवस वाट पाहिली, पण कदाचित दहशतवाद हा त्यांचा उपजीविका मार्ग आहे. जेव्हा त्यांनी काहीही केले नाही, तेव्हा मी माझ्या सशस्त्र दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले.

पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा - 

भारताच्या प्रत्युत्तरानंतर पाकिस्तान घाबरला आहे. त्यांनी कच्छसह सीमावर्ती भागात ड्रोन पाठवले. 1971 च्या युद्धादरम्यान, कच्छच्या शूर महिलांनी 72 तासांत भुज धावपट्टी दुरुस्त करून पाकिस्तानच्या प्रचाराला हाणून पाडले होते. कच्छशी माझे नाते जुने आहे. कच्छचे लोक आणि त्यांचा विश्वास नेहमीच माझे मार्गदर्शक राहिले आहेत. जेव्हा नर्मदेचे पाणी पहिल्यांदाच कच्छमध्ये पोहोचले, तो दिवस कच्छसाठी दिवाळीपेक्षा कमी नव्हता आणि तो एक अभूतपूर्व उत्सव होता. सुदैवाने तुम्ही सर्वांनी मला याचे कारण बनण्याची संधी दिली. आज येथे 50 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन झाले आहे. एक काळ असा होता जेव्हा संपूर्ण गुजरातमध्ये इतक्या मोठ्या प्रकल्पाची घोषणा केली जात नव्हती, आणि आता इतक्या मोठ्या विकास कामाचा लाभ एका जिल्ह्याला मिळेल. या प्रकल्पामुळे भारताला जगातील नील अर्थव्यवस्था बनण्यास मदत होईल, असा विश्वासही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.