प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

देशातील कोणत्याही बँकेत कमीत कमी रक्कम खात्यात असावी याची सुचना आधीच दिली जाते. तसेच खात्यात पुरेशी रक्कम नसल्यास बँकेकडून त्याचे अतिरिक्त पैसे वसूल केला जातात. पण सॅलरी खात्यासाठी हा नियम लागू होत नाही. मात्र असे काही खाते आहे जेथे कमीत कमी रक्कम ठेवण्याची गरज नसते. त्यानुसार प्रधानमंत्री जन-धन योजनेचा यामध्ये समावेश आहे. या योजनेच्या अतिरिक्त ग्राहकांना अन्य सुविधा सुद्धा दिल्या जातात. यामध्ये ग्राहकांना ऑफरड्राफ्ट ही सुविधा दिली जात असून रुपे डेबिट कार्ड ही दिले जाते. या डेबिट कार्डवर 1 लाख रुपयांपर्यंत अपघाताचा इन्शुरन्स मोफत मिळतो.

तर जन-धन योजनेमध्ये देण्यात येणाऱ्या ओव्हरड्राफ्ट सुविधेपूर्वी ग्राहकांना 6 महिन्यापर्यंत पुरेशी रक्कम खात्यात जमा करणे आवश्यक आहे. तसेच रुपे डेबिट कार्ड मधून नियमित स्वरुपात ट्राजॅक्शन करणे सुद्धा अनिवार्य आहे. त्यानंतर ज्या बँकेत खाते सुरु केले आहे आणि त्यांनी या योजनेच्या अटी मान्य केल्यास त्यांना 5 हजार रुपयापर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जाते. मात्र ही सुविधा मिळण्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे ग्राहकाचे खाते जन-धन योजनेसोबत लिंक असावे. जर खातेधारकाने जुन्या बॅलेंस योग्य वेळी क्लिअर केल्यास त्यांना पुढे जाऊन कर्जाची सुद्धा सुविधा दिली जाते.(GST दर 10 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता, सामान्यांच्या खिशाला लागणार झटका) 

जन-धन योजनेसोबत आधार कार्ड लिंक केले असल्यास त्या ग्राहकांना सरकारी सब्सिडीअंतर्गत त्याचा लाभ घेता येणार आहे. त्याचसोबत सब्सिडीचे पैसे ग्राहकाच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. तसेच 15 ऑगस्ट 2014 ते 26 जानेवारी 2015 दरम्यान एखाद्याने जन-धन खाते सुरु केले असल्यास त्यांना 30 रुपयांचे इन्शुरन्स कव्हर मिळणार आहे. एवढेच नाही तर खाते धारकाला चेकबुक सुविधा हवी असल्यास त्यांना खात्यात पुरेशी रक्कम ठेवणे गरजेचे आहे.