देशात आपण जर रेल्वेचे तिकिट बुकिंग केल्यानंतर त्याचे कंन्फर्मेशन येईपर्यंत आपल्याला वाट पहावी लागते. तसेच काही वेळेस तिकिट रद्द सुद्धा काहीजण करतात. यामुळे तुमच्या प्रवासावर परिणाम होतो. याच कारणास्तव आता मुंबईतील स्टार्टअप रेलोफाय (Relofy) यांनी भारतातील पहिले वेस्टलिस्ट आणि आरएसी प्रोटेक्शन सेवा सुरु केली आहे. जी भारतातील वेटिंग लिस्टची समस्या सोडवणार आहे. प्रवाशांना दूरचा प्रवास करण्यासाठी विमान किंवा रेल्वे सेवा हे पर्याय उपलब्ध असतात. परंतु विमानाचे तिकिट काही वेळेस महाग असल्याने प्रवासी ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करणे पसंद करतात. त्यामुळे प्रवाशांना चार्ट तयार होण्याची प्रतीक्षा करावी लागते. पण तिकिट कंन्फर्म न झाल्यास प्रवास रद्द करावा लागतो.
दीपिका अग्रवाल या एका प्रवासी महिलेने IANS यांना असे म्हटले की, मुंबई ते दिल्ली असा प्रवास करायचा होता. आमच्या 6 जणांचे तिकिट वेटिंग लिस्टवर होते. तिकिटाच्या शेवटच्या तारखेपर्यंत ती कंन्फर्म झाली नव्हती. त्यानंतर आम्ही या अॅपच्या मदतीने आमचा प्रवास पूर्ण केला. खरंतर प्रवाशांना रेलोफायच्या वेबसाईट किंवा अॅपवर जाऊन आपल्या तिकिटाचा PNR क्रमांक द्यायचा आहे. तेथेच प्रवाशांना शुल्क जमा करावे लागणार आहेत. जे प्रत्येक प्रवासासाठी ठरवले आहेत.
त्यानंतर रेलोफाय प्रवाशाच्या वेटिंग लिस्टचे तिकिट ट्रॅक करतो. जर तिकिट कंन्फर्म न झाल्यास रेलोफाय प्रवाशाला विमानाची तिकिट देऊन त्याचा प्रवास पूर्ण करण्याची संधी देतो. तसेच ट्रेनच्या तिकिटांच्या दरातच विमानाचे तिकिट दिले जाते. दीपिका हिने पुढे असे ही म्हटले की, जसे मी सांगितले आमच्या 6 जणांची तिकिटे वेटिंग मध्ये होती. त्यावेळी तत्काळ तिकिटाचे दर 4 हजार रुपये होते. मार्केटमध्ये विमानाच्या एका तिकिटाचा दर 5 हजार रुपये होते. आम्हाला रेलोफायची मदत मिळाली.(Navy's First Women Combat Aviators: सब लेफ्टनंट कुमुदिनी त्यागी आणि रिती सिंग या 2 महिला अधिकाऱ्यांची इतिहासामध्ये पहिल्यांदाचं नौदलाच्या हेलिकॉप्टर तुकडीमध्ये Observers म्हणून नियुक्ती)
रेलोफायच्या संस्थापकांच्या टीमने म्हटले की, जवळजवळ 30 करोड भारतीय नागरिक वेटिंग लिस्टमध्ये भरडले जातात. आम्हाला असे वाटते की प्रवाशाला प्रवासावेळी कोणताही त्रास होऊ नये. जानेवारी 2020 पर्यंत आम्ही हे सुरु केले आहे. गेल्या काही महिन्यात 100 प्रवाश्यांनी आमच्या माध्यमातून प्रवास पूर्ण केला आहे.
त्यांनी असे ही म्हटले की, रेलोफायची सेवा सध्या देशात सर्व ट्रेन आणि क्लासेससाठी उपलब्ध आहे. कोरोना व्हायरसच्या दरम्यान प्रवासी मजूरांनी आमच्या सेवेचा लाभ घेतला आहे. जे लोक कामावर पुन्हा परतले आहेत ते सुद्धा आमच्या माध्यमातून प्रवास पूर्ण करत आहेत.
रोहन यांनी असे म्हटले की, ज्या प्रवाशांचे गाव विमानतळापासून दूर आहे त्यांना रेलोफाय त्यांच्या घरापासून ते विमानतळापर्यंत पोहचण्याची सुविधा देतो. तसेच रेलोफाय लांब पल्ल्याच्या प्रवास सोपा बनवण्यासाठी लहान महामार्गांसाठी बसची सुविधा सुरु करणार आहे. त्यामुळे प्रवाशांना कमीत कमी त्रास व्हावा.