केरळसह (Kerla) संपूर्ण देशात ओनम (Onam) हा सण आनंदाने साजरा केला जातो. हा सण एकूण दहा दिवस साजरा केला जातो. नववर्षाचं (New Year) स्वागत करण्यासाठी केरळ राज्यात ओनम हा सण साजरा करतात. केरळमध्ये ओनम सणानिमित्त इडली खाण्याच्या स्पर्धेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. केरळमधील कांजीकोडे येथून ही घटना उघडकीस आली आहे. सुरेश असे मृताचे नाव असून त्याचे वय 50 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा - Kerala: केरळमध्ये निपाह व्हायरसची लागण झालेल्या 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू; उपचारादरम्यान आला हृदयविकाराचा झटका)
मिळालेल्या माहितीनुसार, सर्वाधिक इडली खाण्याची ही स्पर्धा होती. जास्त इडली तोंडात घातल्यामुळे इडली घशात अडकली. त्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. आलमराम पलक्कड येथील सुरेशनेही या स्पर्धेत भाग घेतला. यानंतर स्पर्धा सुरू झाली.
यावेळी सुरेशने एकाच वेळी तीन इडल्या खाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्या घशात दुखू लागले. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर सुरेशच्या घरावर शोककळा पसरली आहे.