कोरोना व्हायरस (Coronavirus) लढाईमध्ये गुंतलेले लाखो डॉक्टर, पॅरामेडीक स्टाफ, स्वच्छता कर्मचारी आणि इतर अनेकांच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, रविवारी देशभरातील अनेक रुग्णालयांवर इंडियन एअर फोर्स (IAF) आणि इंडियन नेव्हीचे (Indian Navy) हेलिकॉप्टर्स फुलांचा वर्षाव करणार आहेत. यासाठी सशस्त्र दलांनी विस्तृत व्यवस्था केली आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली. 'कोरोना वॉरियर्स' चे आभार मानण्यासाठी आज तिन्ही सेवा अनेक उपक्रम राबवणार आहेत.
रविवारी सकाळी साधारण 9 वाजता दिल्ली आणि इतर अनेक शहरांमध्ये पोलिस स्मारकाला पुष्पहार अर्पण करून, हे आभारप्रदर्शन सुरू होईल. देशभरात लॉकडाउनच्या अंमलबजावणीसाठी तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम राबला जाईल. रविवारी, एअरफोर्स 2 फ्लाय पास्ट करेल, यातील एक श्रीनगर ते त्रिवेंद्रम आणि दुसरे दिब्रूगड ते कच्छ दरम्यान असेल. यामध्ये ट्रान्सपोर्ट आणि लढाऊ विमानांचा समावेश असेल.
#WATCH: Indian Navy conducts rehearsals off Mumbai coast ahead of its ceremony to honour the efforts of frontline workers in the fight against #COVID19. pic.twitter.com/ihxNSzOQti
— ANI (@ANI) May 2, 2020
दिल्ली-एनसीआरमधील कोरोना वॉरियर्सना सकाळी दहा ते सकाळी साडेदहा या वेळेत हवाई सलामी देण्यात येणार आहे. या दरम्यान, सुखोई -30, मिग -29, जग्वार, सी -130 ट्रान्सपोर्ट विमान यासारखी लढाऊ विमान हवेत कला सादर करतील. दिल्ली, मुंबई, जयपूर, अहमदाबाद, गुवाहाटी, पटना आणि लखनऊ या शहरांमध्ये आयएएफची लढाऊ विमाने या उपक्रम राबवतील. श्रीनगर, चंदीगड, दिल्ली, जयपूर, भोपाळ, मुंबई, हैदराबाद, बेंगलोर, कोयंबटूर आणि तिरुवनंतपुरम अशा अनेक शहरांमध्ये सैन्याच्या वाहतुकीची विमाने अशाच कवायती दाखवतील.
लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय तटरक्षक दलाची जहाजे पोरबंदर, ओखा, रत्नागिरी, डहाणू, मुरुड, गोवा, न्यू मंगलोर, कावराटी, कराईकल, चेन्नई, कृष्णापट्टणम, निजामपट्टनम, पुद्दुचेरी, काकीनाडा, पारादीप, सागर बेट, पोर्ट ब्लेअर, डिगलीपूर, मायाबंदूर, हट बे आणि कॅम्पबेल बे अशा 24 ठिकाणी रोषणाईमध्ये दिसतील.
भारतीय सैन्याने प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना हॉस्पिटलजवळ बॅन्ड परफॉरमेंस देण्याचा निर्णय घेतला आहे. हे बँड शो सुमारे एक तास चालतील. या माध्यमातून कोरोना वॉरियर्सना सलाम करण्यात येईल. त्याचप्रमाणे नेव्ही आपल्या युद्धनौकांवर विजेची रोषणाई करेल. शुक्रवारी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत आणि तीन सैन्य प्रमुखांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. (हेही वाचा: कर्नाटकात 4 मे पासून रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये Containment Areas सोडून सुरु होणार स्वतंत्र दारूची दुकाने; जाणून घ्या Liquor Stores ची वेळ)
मुंबईच्या किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल आणि विशाखापट्टणमच्या जेजे मेमोरियल हॉस्पिटलमध्ये, सकाळी 10 ते सकाळी 10.45 वाजेपर्यंत पुष्पवृष्टी केली जाईल. यावेळी, भारतीय हवाई दलाचे Mi17 हेलिकॉप्टर फ्लायपास्ट करेल. भारतीय हवाई दलाचे Su30s लढाऊ विमान सकाळी साडेदहा वाजता मरीन ड्राईव्हवर फ्लायपास्ट करेल. C130 परिवहन विमान दुपारी 1.15 वाजता मरीन ड्राईव्हवर फ्लायपास्ट करेल.