Ganpati Festival (Photo Credits-Twitter)

गणपतीचा सण (Ganpati Festival) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आता पासून सर्वत्र गणपतीच्या आगमनासाठी जोरदार तयारी करताना दिसून येत आहेत. मात्र गणशोत्सवासाठी हैदराबाद (Hyderabad) येथे काही नियम घालण्यात आले आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करु नये असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.

यंदा गणपतीचे आगमन 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. तर हैदराबाद मधील पोलीस कमिश्नर अंजनी कुमार यांनी मात्र गणपतीवेळी फटाके फोडण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे 2 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर पर्यंत सकाळी 6 वाजल्यापासून फटाके वाजवून नये असा आदेश दिला आहे. परंतु पोलिसांच्या या निर्णयामुळे आता काय नवा वाद निर्माण होईल हे पाहणे महत्वाचे असणार आहे.(गणेशोत्सव 2019 च्या मिरवणूकांदरम्यान कमजोर पुलांवर नाचणं टाळा; प्रशासनाचं गणेशभक्तांना आवाहन)

ANI ट्वीट:

तसेच मोदी सरकारने जम्मू-कश्मीर संबंधित घेतलेल्या निर्णयावरुन पाकिस्तान आधीच संतापला आहे. त्यामुळे देशात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या दृष्टीने महत्वाच्या सणावेळी आणि अन्य वेळी सुद्धा सुरक्षितेत अधिक वाढ करण्यात आली आहे.