BJP MLA T Raja Singh Arrested: भाजप नेता टी. राजा यांना अटक; प्रेषित पैगंबरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण
T Raja Singh | (Photo Credit - ANI/Twitter)

तेलंगणा (Telangana) राज्यातील भाजप आमदार टी. राजा सिंह (BJP MLA T Raja Singh) यांना अटक झाली आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर (Prophet Muhammad) यांच्याबद्दल अनुचीत उद्गार काढून धार्मिक भावना दुखावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. टी राजा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष पाहायला मिळत होता. हैदराबाद (Hyderabad) येथे लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले हरोते. त्यानंतर हैदराबाद पोलिसांनी (Hyderabad Police) आज (मंगळवार, 23 ऑगस्ट) सकाळी टी. राजा यांना अटक झाली.

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल कथीत वक्तव्य केल्यानंतर टी राजा यांच्या विरोधात काही ठिकाणी तक्रारी दाखल झाले होते. प्राप्त तक्रारींवरुन पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हेही दाखल केले होते. दबीरपुरा भवानी नगर, रेनबाजार, मीराचौक पोलीस स्टेशन आदी ठिकाणी नागरिकांनी तक्रार दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. टी राजा यांच्या वक्तव्यानंतर आपल्या भावना तीव्र स्वरुपात व्यक्त करत अनेक नागरिकांनी म्हटले की, त्यांनी आमच्या भावना दुखावल्या आहेत.

दरम्यान, टी.राजा यांनी नुकताच आपला एक व्हिडिओ अपलोड केला होता. यात त्यांनी पैगम्बर मोहम्मद यांच्या विरोधात वक्तव्य केले होते. प्राप्त माहितीनुसार, सोमवारी रात्री पोलीस कमिशनर सीव्ही आनंद यांच्या कार्यालयासमोर आणि शहरातील इतरही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निदर्शने सुरु झाली. निदर्शन करणारे लोक त्यांच्या मागण्यांवर अडून होते. या व्हिडिओमध्ये टी. राजा यांनी कॉमेडियन मुनव्वर फारुकी आणि त्यांच्या आईबद्दलही टीप्पणी केली होती. (हेही वाचा, Nupur Sharma Case: नुपूर शर्माच्या याचिकेवर सुनावणी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी 'वैयक्तिक हल्ला' करणाऱ्यांना फटकारले)

ट्विट

टी. राजा सिंह यांनी हैदराबाद गोशामहल विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. या आधी त्यांनी कॉमेडियन मुनव्वर फारुकी यांनाही धमकी दिली होती. या प्रकरणा त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होत. वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, आमदार टी राजा सिंह यांनी मुनव्वर फारुकी यांना त्यांचा कार्यक्रम रद्द करण्याबाद्दल वक्तव्य केले होते. परिणामी त्यानंतर सुमारे 50 लोक परिसरात पोहोचले होते. मात्र त्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक रित्या ताब्यात घेतले.

टी राजा यांच्या आगोदर नुपुर शर्मा यांनीही एका वृत्तवाहिणीवर प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीप्पणी केली होती. या नंतर देशभरात त्यांच्या विरोधात आंदोलने, निदर्शने झाली. देशातील वेगवेगळ्या भागात त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले. पैगम्बरांबद्दल टीप्पणीचा वाद वाढल्यावर त्यांना पक्षातून निलंबीत करण्यात आले होते.