Hyderabad Encounter: आरोपींनी या आधी 9 महिलांवर बलात्कार करून जाळलं असल्याचा तेलंगणा पोलिसांनी केला मोठा खुलासा
Hyderabad rape case crime spot and Cyberabad CP VC Sajjanar. (Photo Credit: ANI)

Hyderabad Encounter: हैदराबाद येथे महिला डोकॅटरवर (Hyderabad Rape Case) झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या करण्याच्या प्रकरणावर रोज नवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील चारही आरोपींना हैदराबाद पोलिसांनी एनकाऊंटरमध्ये मारले, ज्यामुळे अनेक स्तरांवरून हैदराबाद पोलिसांच्या या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आली. म्हणूनच या सर्वांची चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने एक समिती नेमली आहे तसेच तेलंगणा सरकारकडून खास SIT चौकशी करण्यात येणार आहे.

दरम्यान, तेलंगणा पोलिसांनी या प्रकरणात एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, या प्रकरणात दोषी असणारे चारही आरोपी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि महिलांवर अत्याचार करणारे होते. तसेच त्यांनी जे केलं ते मानवतेच्या विरुद्ध आहे. त्यांनी अशाच प्रकारे 9 महिलांची हत्या केली आहे.

पोलीस असंही म्हणाले की या आरोपींनीच तशी कबूली दिली होती व या आरोपींनी यातल्या काही घटना कर्नाटक सीमेवर झाला असल्याचं सांगितलं होतं.

पोलिसांनी या चौकशी दरम्यान सांगितलं की त्यांनी या पीडित महिलांची माहिती मिळवणं सुरू केलं आहे. तसेच तेलंगणा येथी संगा रेड्डी, रंगा रेड्डी आणि मेहबूबनगर हाइवे आणि कर्नाटकातल्या सीमावर्ती शहरांमध्ये या घटना घडल्या आहेत त्यामुळे पोलिसांनी या घटनांचा शोध घेण्यासाठी खास पथकं स्थापन केली आहेत.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार पैकी दोन आरोपींनी, शस्त्र हिसकावल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला होत. पोलिस आयुक्त सी.व्ही. सज्जनार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही आरोपींपैकी एकाने प्रथम गोळी झाडली होती. म्हणूनच पोलिसांना गोळीबार करावा लागला होता. दरम्यान या चकमकीत चारही आरोपींचा एनकाऊंटर करण्यात आला.