हैदराबाद येथे पुन्हा 18 वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाकडून मदतीच्या बहाण्याने बलात्कार
प्रतिकात्मक प्रतिमा | (Photo Credits: File Photo)

हैदराबाद येथे गेल्याच आठवड्यात झालेल्या तरुणीवर बलात्कारनंतर जाळल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पुन्हा एकदा असाच प्रकार घडला आहे. तर 18 वर्षीय तरुणीला मदतीच्या बहाण्याने रिक्षा चालकाकडून कथित बलात्कार केला असल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित तरुणीन तिच्या लहान बहिणीसोबत बाहेर गेली असता ती रस्ता विसरली त्यावेळी रिक्षा चालकाने मदतीचा हात पुढे करत तिच्यासोबत अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली.

आरोपी रिक्षाचलाकाने पीडित तरुणीवर नामपल्ली येथील एका लॉजवर तरुणीला घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी हैदराबाद येथे महिला डॉक्टर हिच्यावर चार जणांनी बलात्कार करत तिला जीवंत जाळल्याची घटना समोर आली होती. या प्रकारामुळे देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला.

त्यानंतर पोलिसांनी चारही आरोपींना घटनास्थळी घेऊन जात त्यांचा एन्काउंटर केला. यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी केलेला अशा प्रकारच्या एन्काउंटरमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तर सुप्रीम कोर्ट आणि तेलंगणा हायकोर्टाच याचिका सुद्धा दाखल करण्यात आल्या आहेत.(Nirbhaya Gangrape Case: दोषींना फाशीची मागणी करणारी याचिका पटियाला हाऊस कोर्टात टळली; सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर होणार फैसला)

 तर दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टमध्ये निर्भया गॅंगरेप प्रकरणातील आरोपींची सुनावणी टळली आहे. फाशीची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी आता याचिकेवर चारही दोषींना आणि त्यांच्या वकिलांना नोटीस देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत सध्या 18 डिसेंबरपर्यंत या सुनावणीला स्थगिती देण्यात आली आहे.  पटियाला हाऊस कोर्टने निर्भयाच्या आईकडून करण्यात आलेल्या फाशीच्या मागणीला फेटाळले आहे.