Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

Delhi Police news: दिल्ली पोलिसांनी 36 वर्षीय इसमाला अटक केली आहे. त्याच्यावर पत्नीची चाकूने भसकून हत्या केल्याचा आरोप (Husband Attack on Wife) आहे. आरोपीला पत्नीवर चारित्र्याचा संशय होता. या संशयातूनच त्याने पत्नीवर चाकूहल्ला केला. ज्यात पत्नीचा मृत्यू (Woman Stabbed to Death) झाला. धक्कादायक असे की, या वेळी झालेल्या झटापटीत त्याची 11 वर्षीय मुलगीही गंभीर जखमी झाली. पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे. तसेच प्रकरणाचा तपास सुरु असून मुलीवर वैद्यकीय उपाचर सुरु आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण मध्यरात्री एकच्या सुमारास पोलीस चौकीमध्ये एक फोन आला. समोरील व्यक्तीने सांगिले की, दिल्लीतील माऊपूर परिसरातील विजय मोहोल्ला येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर चाकूने अनेक वार केले आहेत. चाकूने भोसकल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी हजेरी लावली असता एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. पोलिसांनी तीला जीबीटी रुग्णायात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तीला उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. महिलेच्या छातीत डाव्या बाजूला आणि हातावर गंभीर आणि खोलवर जखमा झाल्या होत्या. ज्यामुळे अतिरक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. सदर महिलेचे नाव निशा असे आहे. ती केवळ 32 वर्षांची होती. तिला सात आणि 11 वर्षे वयाच्या दोन मुली आहेत. ज्यातील 11 वर्षांची वडिलांनी (आरोपी) आईवर केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली. हल्ला झाला त्या वेळी दोघीही घरी उपस्थित होत्या. जाफराबाद पोलिसांनी आरोपी पती साजीद वय (36) याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 302/307 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा, Surat Shocker: प्रेयसीच्या 13 वर्षीय मुलीवर बलात्कार, चाईल्डलाईन सेवकांच्या मदतीने आरोपीला अटक)

ट्विट

पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, साजीद याला आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय होता. ती व्याभीचार करत असावी असे त्याला सतत वाटत असे. तो बेकार असल्याने काहीही कमाई करत नसे. तसेच घरामध्येही तो कोणत्याही प्रकारचे योगदान देत नसे. काही दिवसांपूर्वीच त्याने मोबाईल रिपेरींगचे दुकान टाकले होते. पोलिसांनी घटनास्थळावरुन चाकू आणि हत्येसाठी वापरलेले इतर साहित्य जप्त केले आहे.