Amit Shah Tested COVID-19 Positive: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांंना कोरोनाची लागण (Coronavirus) झाली असुन त्यांना त्वरित दिल्ली मधील मेदांता हॉस्पिटल (Medanta Hospital) मध्ये दाखल करण्यात आले आहे. अमित शहा यांनी स्वतः आपल्या ट्विटर अकाउंट वरुन याविषयी माहिती दिली आहे. कोरोनाचे प्राथमिक लक्षण दिसुन येताच आपण त्वरित कोरोनाची चाचणी केली होती आता त्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आपली तब्येत ठिक आहे मात्र डॉक्टरांच्या सांंगण्यानुसार हॉस्पिटल मध्ये दाखल झाले आहोत असेही अमित शहा यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे. याशिवाय अमित शहा यांंनी मागील काही दिवसात आपल्या संंपर्कात आलेल्या सर्वांना सुद्धा स्वतःला आयसोलेट करुन घेण्याचे आवाहन केले आहे.
मागील काही दिवसांपासुन अमित शहा यांंना कोरोनाची लक्षणे जाणवत होती, बहुदा याच कारणाने त्यांनी 5 ऑगस्ट रोजी होणार्या श्रीराम जन्मभूमि मंंदिराच्या भुमी पुजन कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान अमित शहा यांच्या ट्विट नंंतर अनेकांनी त्यांना रिप्लाय करत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अमित शहा ट्विट
कोरोना के शुरूआती लक्षण दिखने पर मैंने टेस्ट करवाया और रिपोर्ट पॉजिटिव आई है। मेरी तबीयत ठीक है परन्तु डॉक्टर्स की सलाह पर अस्पताल में भर्ती हो रहा हूँ। मेरा अनुरोध है कि आप में से जो भी लोग गत कुछ दिनों में मेरे संपर्क में आयें हैं, कृपया स्वयं को आइसोलेट कर अपनी जाँच करवाएं।
— Amit Shah (@AmitShah) August 2, 2020
दरम्यान यापुर्वी मध्य प्रदेश चे मुख्यमंंत्री शिवराज सिंह चौहान यांंना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. आज सकाळीच युपी कॅबिनेट मंत्री कमला राणी वरुण यांचे कोरोनाने निधन झाले आहे. कोरोना विरुद्ध लढ्यात लढताना या सर्व राजकारणी मंडळींची सुद्धा धावपळ होत असल्याने प्रकृतीची काळजी घेणे कठीण झाले आहे.